शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजना वीजबिलामुळे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:41 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचे वीजबील थकल्याने संकटात सापडण्याची चिन्हे आहे. दोन दिवसांत वीजबील न भरल्यास वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे फलक पंचायत समितीच्यावतीने ठाणगाव येथे लावण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचे वीजबील थकल्याने संकटात सापडण्याची चिन्हे आहे. दोन दिवसांत वीजबील न भरल्यास वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे फलक पंचायत समितीच्यावतीने ठाणगाव येथे लावण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे. तालुक्यातील ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून योजनेचे २३ लाख रूपयांच्या आसपास वीजबील थकल्याने योजनेचा वीज पुरवठा खंडीत होण्याच्या मार्गावर आहे. धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असतांनाही केवळ वीज बिल थकल्याने योजना बंद होते की काय असा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे. ठाणगाव जवळील उंबरदरी धरणाच्या पाण्यावर सदरची पाणीयोजना अवलंबून आहे . २००७ साली ही योजना सुरु झाली असून आजपर्यंत ही योजना बारामाही सुरळीत सरू आहे. योजनेत ठाणगाव, पाडळी, टेंभुरवाडी, हिवरे, पिंपळे आदी सह वाडया वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेचे २३ लाख रुपये वीजबिल थकल्याने पंचायत समिती स्तरावरून योजनेतील सर्वच ग्रामपंचायतींनी दोन दिवसांत थकीत रक्कम जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. ग्रामपंचायतींनी आपल्या कडील थकीत रक्कम भरली नाही तर पाचगाव पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद होणार असल्याचे फलक गावात लावण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ठाणगाव ग्रामपंचयतीकडून नळ धारकांचे घरोघरी जावून वसुलीसाठी प्रयत्न केले जात आहे. ग्रामस्थ व शेतकरी आपल्या कडील थकीत असणारी नळपट्टी थोडया फार प्रमाणात का होईना पण ग्रामस्थ स्व:ताहून पाणीपटटी भरताना दिसत आहे. योजनेत सहभागी गावामधून ठाणगाव ग्रामपंचायतीचा नेहमीच महत्त्वाचा सहभाग असल्याने वीजबिलाचा बोजाही या ग्रामपंचायतीवर सर्वाधिक आहे.

टॅग्स :Nashikनाशिक