शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बसमधून जाणार पालखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 00:29 IST

त्र्यंबकेश्वर : श्री सद्गुरु संत निवृत्तिनाथ महाराज याची पालखी दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृष्ण-१ रोजी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. तथापि, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता दिंडी सोहळा स्थगित करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर : श्री सद्गुरु संत निवृत्तिनाथ महाराज याची पालखी दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृष्ण-१ रोजी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. तथापि, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता दिंडी सोहळा स्थगित करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. आता शासनाच्या आदेशानुसार आषाढ शुद्ध दशमीला शिवशाही बसमधून फक्त २० मानकरी पालखीसह पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.सोमवारी (दि.१८) विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आषाढीवारीसाठी यंदा संत निवृत्तिनाथांची पालखी पंढरपूरला जाणार किंवा नाही याबाबत वारकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र, आता विश्वस्त मंडळाने शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सूचनेनुसार दिंडी सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, २० मानकरी शिवशाही बसने पालखी घेऊन पंढरपूरला रवाना होणार आहेत.सदर दिंडीचे दशमीला पंढरपूर येथे आगमन झाल्यानंतर दि. ३० रोजी मुक्काम व दुसºया दिवशी देवशयनी आषाढी एकादशीला पंढरपूर यात्रा दर्शनादी सोपस्कार पार पडल्यानंतर पुन्हा बसनेच त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करणार आहे. राज्य शासनाच्या सूचनांचा आदर करून विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाधी संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा होते, तर विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पंडितराव कोल्हे, रामभाऊ मुळाणे, पुंडलिकराव थेटे, जयंत गोसावी, योगेश गोसावी, ललिता शिंदे जिजाबाई लांडे, मधुकर लांडे, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.--------------------------पालखीसमवेत जाणार २० मानकरीपालखीसमवेत समाधी संस्थानचे मानकरी मनोहर महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, बाळासाहेब देहूकर महाराज, जयंत महाराज गोसावी आदींसह विश्वस्त मंडळ शिवशाही बसने जाणार आहेत. दरम्यान शासनाने शिवशाही बस उपलब्ध करून द्यावी. बसमध्ये फक्त २० प्रवासी असतील. तसेच बस समवेत पोलीस बंदोबस्त असावा अशीही मागणी शासनाकडे करणार असल्याचे पवनकुमार भुतडा यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक