शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेच्या रक्षणार्थ रंगकर्मी सदैव सज्ज :  प्रेमानंद गज्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:02 IST

समाजातील मानवता तत्त्वाच्या रक्षणार्थ रंगकर्मी आणि रंगभूमी सदैव सज्ज असते. कलाकृतीतून मांडलेल्या दृष्टीकोनातून ठाम राहणे हीच खरी कलावंतांची ताकद असते, असे प्रतिपादन प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले.

नाशिक : समाजातील मानवता तत्त्वाच्या रक्षणार्थ रंगकर्मी आणि रंगभूमी सदैव सज्ज असते. कलाकृतीतून मांडलेल्या दृष्टीकोनातून ठाम राहणे हीच खरी कलावंतांची ताकद असते, असे प्रतिपादन प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले. त्याआधी अष्टपैलू कलाकार संतोष पवार यांना ‘मधुकर तोरडमल स्मृती चतुरस्त्र रंगकर्मी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.रंगमंच मुंबई, अमेय, तोरडमल परिवार आणि रवींद्र ढवळे अमृतमहोत्सव समिती यांच्यातर्फेपरशुराम साईखेडकर नाट्यमंदिरात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अमेय संस्थेच्या अपर्णा प्रभू, शर्मिला तोरडमल, निर्माते रमेश तलवारे, नंदकुमार देशपांडे, ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र ढवळे, रंगमंचचे प्रमुख उपेंद्र दाते उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना गज्वी म्हणाले की, संतोष पवार हा तोरडमल यांच्यासारखाच उत्स्फूर्त कलावंत असून शाहीर साबळे यांच्या हाताखाली तयार झालेली माणसे चतुरस्त्र आहेत.पुरस्कार सोहळ्यानंतर संतोष पवार यांनी, चतुरस्त्र कलाकार म्हणून मिळालेला हा पुरस्कार समाधान देणारा असल्याचे सांगितले. मी कोणतीही गोष्ट ठरवून केली नाही. केवळ शाहीर साबळेंकडे महाराष्टÑाची लोकधारा करायला गेलो आणि सारे काही आपोआप जमत गेल्याचे सांगितले. प्रास्ताविक उपेंद्र दाते यांनी केले. सूत्रसंचालन अदिती मोराणकर यांनी तर आभार राजेश टाकेकर यांनी मानले.राज्यकर्त्यांपासून सावध रहावेअनेक कलाकृतींच्या निर्मितीवर आक्षेप घेतले जातात, पण जे आक्षेप घेतात त्यांना मुळात नाटकातले काही कळतही नसते. भविष्यातदेखील कलाकृतींच्या निर्मितीवर संकटे येतच राहतील. जगविख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांनादेखील हा देश सोडून जाण्यास भाग पाडले गेले होते. मात्र, त्यांनी त्यांच्या काढलेल्या चित्रांबाबत कधीही माफी मागितली नाही. आपले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर राज्यकर्त्यांपासून सावध राहिले पाहिजे, असेही गज्वी यांनी नमूद केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक