नाशिक : विनयनगरातील शक्तिधाम येथे पाडवा पहाट भावभक्ती गीतांची मैफल साजरी करण्यात आली.कोरोनाच्या महासंकटानंतर शासनाने मंदिर उघडण्यास मान्यता दिल्यानंतर विनयनगर येथील शक्तिधाम आदिशक्ती श्री सप्तशृंगी मातेच्या चरणी पहाट पाडवा सोशल डिस्टन्स पाळून साजरा करण्यात आला.तेजस कंसारा सिद्धकला वाद्यवृंदचे विपुल आपटे, अपर्णा चौगुले यांनी जुनी नवी भावगीते-भक्तिगीते सादर केली. त्यांना तेजस कंसारा, वैभव काळे, मयूर भालेराव, विरेंद्र काळे, जय चौघुले यांनी साथसंगत केली.त्यानंतर कोरोना या संकटाचे समूळ उच्चाटन होऊन सर्वांना आरोग्यदायी जीवन देण्याचे साकडे यावेळी माता श्री सप्तशृंगी चरणी करण्यात आले. सप्तशृंगी देवी मंदिर ( शक्तिधाम ) ट्रस्ट समितीच्या वतीने कलाकार व ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
शक्तिधाम येथे पाडवा पहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:17 IST
नाशिक : विनयनगरातील शक्तिधाम येथे पाडवा पहाट भावभक्ती गीतांची मैफल साजरी करण्यात आली.
शक्तिधाम येथे पाडवा पहाट
ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.