शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला जपानुष्ठान सोहळ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:14 IST

येथील  जगद्गुरु जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज आश्रमात आठ दिवसांपासून मौनव्रतात सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची ‘जय बाबाजी’, ‘जय बाणेश्वर’च्या जयघोषात सांगता करण्यात आली.

ओझर टाउनशिप : येथील  जगद्गुरु जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज आश्रमात आठ दिवसांपासून मौनव्रतात सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची ‘जय बाबाजी’, ‘जय बाणेश्वर’च्या जयघोषात सांगता करण्यात आली. महामंडलेश्वर समर्थ सद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ओझर येथील आश्रमात जपानुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप, हस्तलिखित जपसाधना, रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, आरती, प्रवचन, सत्संग, एकनाथी भागवत वाचन, १०८ शिवलिंग तसेच १०८ गोमुख स्थापना, श्री गणेश, हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा आदी कार्यक्रम झाले. जपानुष्ठानला बसणाऱ्या भाविकांनी आयुष्यभर व्यसनमुक्त आणि शाकाहारी राहण्याचा संकल्प  केला. यावेळी साधकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आठ दिवस केवळ हवेवर जपानुष्ठान करणाºया साधकास स्वामी शांतिगिरी महाराज यांनी  तीर्थ देऊन जपानुष्ठानाची सांगता केली. आठ दिवस  केवळ पाणी आणि दुधावर जपानुष्ठान करणाºया साधकांच्याही व्रताची सांगता रामानंद महाराज यांच्या हस्ते तीर्थ देऊन करण्यात आली.  कार्यक्रमाच्या सांगतेनिमित्त ओझर परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत जपानुष्ठानास बसलेल्या साधकांसह कलशाधारी महिला, कुमारिका सहभागी झाल्या होत्या. सत्संग सोहळ्याप्रसंगी ब्रह्मचारी रामानंदी महाराज यांनी, जपानुष्ठान  आजच्या काळाची गरज असून, अनेक प्रकारचे संस्कार जपानुष्ठानाच्या माध्यमातून केले जातात. मौनव्रतामुळे आत्मिक शक्ती वाढून आध्यात्मिक ऊर्जा मिळते. जीवनात प्रत्येकाने सद्गुरु करावे आणि त्यांच्या आदेशाचे पालन करावे. प्रत्येकाने वर्षातून एकतरी जपानुष्ठान करावे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक