ओझर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत व्यासपीठावर उपनिरीक्षक गणपत जाधव, युवराज आहिरे, प्रकाश महाले, श्रीकांत अक्कर, विनोद विधाते, नगरपरिषद कर्मचारी अंबादास शेलार, संतोष सोनवणे उपस्थित होते.
महावितरण कंपनीकडून सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येणार असून त्याप्रमाणे वीज आकारणी करण्यात येईल तसेच अनधिकृत विजेचा वापर करू नये. चांगली गुणवत्ता असलेल्या वस्तू वापरून विजेची बचत करावी असे सहाय्यक अभियंता सोनवणे यांनी यावेळी सांगितले.
गर्दी कमी केल्यास कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. त्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमाचे पालन करावे. सर्व गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती संकलन करण्यासाठी पुढाकार घ्यावा व प्रदूषण टाळावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी केले.