ओझर टाऊनशीप : एका घरातील सर्र्वकुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आज्ञात चोरट्यांनी घरातून चार हजार रुपये रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ३४ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला.प्रिया गडाख, राहणार आनंदनगर, ओझर या सहकुटुंब बाहेरगावी गेल्या असताना त्यांच्या घराचा लोखंडी दरवाजा उघडून मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी पलंगात पिशवीत ठेवलेले चार हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३४ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची तक्रार प्रिया गडाख यांनी आज पोलिसांत दिली. अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)
ओझर टाऊनशीपला घरफोडी
By admin | Updated: November 14, 2016 00:36 IST