ओझर टाऊनशिप : एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली मोटारसायकल चोरट्याने चोरून नेल्याची घटना ओझर येथे घडली आहे. दरम्यान चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. बुधवारी (दि.७) रात्री आरीफ पठाण ( रा. कोहेसफा अपार्टमेंट, पंचवडनगर, ओझर) यांनी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एमएच १५ सीएच ३०७२) अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. चोरट्याने ती चोरून नेली. मोटारसायकल चोरीचा हा प्रकार पहाटे ४ वाजेदरम्यान घडला असून, चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये असलेल्या अनेक मोटारसायकलींचे पेट्रोलही पाइप कट करून काढले. तसेच त्यांच्याजवळील मास्टर कीने गाड्याचे हँडल लॉक उघडण्याचा प्रयत्न केला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.
ओझरला मोटारसायकलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:18 IST