ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात मंगळवारी ४२ नविन रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने ओझरसह परिसरातील आतापर्यत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७७५ झाली आहे. आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला असुन १३७४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ओझर परिसरात कोरोनाचे रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकामध्ये चिंतेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.ओझरटाऊनशिप, ओझरसह परिसरात आज ४२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये ओझरटाऊनशिप १, टिळक नगर ३, शिवाजी नगर ४, गणेश नगर १,समर्थ नगर १, यमुना नगर २, दत्त नगर ३, गोकुळ कॉम्प्लेक्स १, लक्ष्मी नगर १, आनंद नगर १, सिन्नरकर टाऊन १, शिंदे मळा ४, कदम मळा १, पाल्हाळ मळा २, आर के १, मधला माळी वाडा १,जाधव वस्ती १, दात्याने १, नागेश्वर चौक ३, निवृत्तीनाथ नगर १, दहावा मैल ४ व श्रीरामनगरमधील मधील ४ रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओझरसह परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
ओझरला नव्याने ४२ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:08 IST
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात मंगळवारी ४२ नविन रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने ओझरसह परिसरातील आतापर्यत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७७५ झाली ...
ओझरला नव्याने ४२ कोरोना बाधित
ठळक मुद्देओझर परिसरात कोरोनाचे रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ