नाशिक : चहा करण्यासाठी पेटविलेल्या स्टोव्हच्या भडक्यात अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्याने गंभीररीत्या भाजलेल्या ओझरच्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली शनिवारी (दि़. ७) घडली़ मयत युवकाचे नाव दिगंबर नारायण शेलार (३३, क्षीरसागर मळा, रिलायन्स पंपामागे, ओझर, ता़ निफाड, जि़ नाशिक) असे आहे़ओझर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास दिगंबर शेलार यांनी चहा करण्यासाठी स्टोव्ह पेटविला असता भडका झाला़ त्यामध्ये अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्याने ते ५९ टक्के भाजलेल्या शेलार यांना त्यांचे दाजी लहानू गांगुर्डे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ भोये यांनी घोषित केले़ (प्रतिनिधी)
स्टोव्हच्या भडक्यात ओझरला एकाचा मृत्यू
By admin | Updated: November 8, 2015 00:08 IST