शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

महापालिकेत राजकारणाला ‘ऑक्सिजन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 1:41 AM

महापालिकेच्या रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा, यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना बरोबर न घेता जागेची पाहणी केली. त्यामुळे आता सत्तारूढ भाजप आणि आयुक्त यांच्यात वाद निर्माण झाल्याचे दिसू लागले आहे. भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी त्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करताना प्रशासनाचा एकतर्फी कारभाराचा निषेध केला आहे. 

ठळक मुद्देआयुक्तांचा पाहणी दौरा : महापौरांना डावलल्याने भाजप नाराज

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा, यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना बरोबर न घेता जागेची पाहणी केली. त्यामुळे आता सत्तारूढ भाजप आणि आयुक्त यांच्यात वाद निर्माण झाल्याचे दिसू लागले आहे. भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी त्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करताना प्रशासनाचा एकतर्फी कारभाराचा निषेध केला आहे. शहरात कोरोना संक्रमण वाढत असून गंभीर रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यात अडचणी येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने आता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहे. हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा हा प्रकल्प असणार आहे. त्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी मोरवाडी येथील शहरी आरोग्य केंद्र तसेच प्रबोधनकार ठाकरे सभागृह येथील मोकळ्या जागेची पाहणी केली. गंगापूर येथील शहरी आरोग्य केंद्राचीदेखील त्यांनी पाहणी केली. याठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प साकारल्यानंतर ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर भरून देणे शक्य होणार आहे. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, वैद्यकीय अधीक्षक  डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी मयूर पाटील, नितीन नेर, डॉ. योगेश कोशिरे आदी उपस्थित होते. दरम्यान, अशाप्रकारचे ऑक्सिजन प्रकल्प साकारण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांना विश्वासात घेणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही. साथ प्रतिबंधक विशेषाधिकाराचा आयुक्त दुरुपयोग करून एकतर्फी निर्णय घेतात आणि काही अनुचित प्रकार घडल्यास अथवा दुर्घटना घडल्यास भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरले जाते. प्रशासनाच्या एकतर्फी कारभाराचा निषेध करण्यात येत असल्याचे भाजपा गटनेते जगदीश पाटील यांनी म्हटले आहे.पक्षावर टीका करणे चुकीचेचडॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात ऑक्सिजन टाकी बसवण्याच्या कामासाठी प्रशासनाने परस्पर निविदा मागवल्या. एकच ठेकेदार कंपनी पात्र ठरेल, अशा अटी ठेवण्यात आल्या. त्यामुळे तीन वेळा निविदा मागवूनदेखील एकच कंपनी पात्र ठरली. आता झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर मात्र प्रशासन सोडून भाजपवर टीका होत आहे. म्हणजेच निर्णय प्रशासनाने घ्यायचे आणि दुर्घटना घडली की सर्वांनी प्रशासन सोडून भाजपावर खापर फाेडण्याचे प्रकार सुरू आहेत. ते चुकीचे आहेत, असे जगदीश पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौर