शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन गळती;  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:49 IST

जुने नाशिक परिसरात असलेले भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी घडलेल्या ऑक्सिजन टाकीच्या गळतीप्रकरणी पोलिसांनी तूर्तास अज्ञातांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेचा सखोल तपास सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ठळक मुद्देसहायक पोलीस आयुक्तांकडे तपास

नाशिक : जुने नाशिक परिसरात असलेले भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी घडलेल्या ऑक्सिजन टाकीच्या गळतीप्रकरणी पोलिसांनी तूर्तास अज्ञातांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेचा सखोल तपास सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात असलेल्या ऑक्सिजन टाकीचा पाइप फुटून झालेल्या गळतीमुळे २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्घटना घडली. या घटनेने केवळ राज्यच नव्हे तर अवघा देश हळहळला. याप्रकरणी नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी तत्काळ घटनेची गंभीर दखल घेत भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांना याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी म्हणून फिर्याद देण्यास सांगितले. सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात या दुर्घटनेला जबाबदार अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून रुग्णालयाच्या आवारात विविधप्रकारे माहितीचे संकलन केले जात आहे. फिर्यादीसाठी मनपाच्या प्रसिद्धीपत्रकाचा आधार घेण्यात आला आहे. २२ रुग्णांचा नावांचाही फिर्यादीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या दुर्घटनेत १२ पुरुष व १० महिला यांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टाकीमधून गळती लागल्याने झाला असून, यात संबंधितांचा  हलगर्जी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तूर्तास अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेचा तपास होऊन त्यामध्ये ज्या कोणाचा हलगर्जीपणा समोर येईल, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून त्यांच्या नावांसह गुन्हा दाखल करण्यात येईल, असे साजन सोनवणे यांनी सांगितले.चौकशी समितीला पंधरा दिवसांची मुदतदुर्घटनेची चाैकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला चौकशी पूर्ण करून पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली असून, समितीने आपला अहवाल तत्काळ शासनाला सादर करावा असे आदेश जारी करण्यात आले आहेत. समितीने पंधरा दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करावा अशा सूचना नगरविकास विभागाचे उपसचिव एस. टी. जाधव यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Nashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळतीPoliceपोलिस