शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरफ्लो जलकुंभातून लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 18:47 IST

लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : शहरातील विविध भागात पाणी टंचाई व दुषीत पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण असून, गंगापूर धरणातील ...

ठळक मुद्देगलथानपणा : अगोदर पाणी टंचाई नंतर अपव्यय

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : शहरातील विविध भागात पाणी टंचाई व दुषीत पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण असून, गंगापूर धरणातील पाणी साठाही कमालिचा घटला आहे, अशा परिस्थितीत महापालिका पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे त्याच महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील विविध जलकुंभ ओव्हरफ्लो होवून त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील वासन नगर येथील पोलिस वसाहती समोरील जलकुंभातून बुधवारी दुपारी लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छा नगर परिसरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसापूर्वी जलकुंभातून पाणी सोडणाºया महापालिकेच्या व्हाल्वमनला परिसरातील संतप्त महिलांनी घेराव घालून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर तातडीने जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम महापालिकेने हाती घेवून पाणी पुरवठा सुरूळीत करण्याचे काम केले. तरी देखील पुरेशा दाबाने व वेळेत पाणी मिळत नसल्याने प्रभाग क्रमांक ३० मधील पाटील गार्डन ते अरुणोदय सोसायटी सह परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असताना बुधवारी दुपारी पावणे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान पोलिस वसाहती समोरील जलकुंभ ओव्हरफ्लो झाला व सदरची बाब व्हॉल्वमनच्या लक्षात न आल्याने लाखो लिटर पाणी वाहू लागले. पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे अवघ्या काही वेळातच जलकुंभ परिसरात जागोजागी पाण्याचे तलाव साचले, भर उकाड्यात शुद्ध पाण्याचा झरा वाहत असल्याचे पाहून परिसरातील बालगोपालांनी या पाण्यात उड्या मारण्याचा आनंद द्विगुणीत केला. शहर पाणी टंचाईने होरपळत असताना वाया जाणारे पाणी पाहून नागरिकांनी तातडीने नगरसेवक पुष्पा आव्हाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यानंतर वेगाने चक्रे फिरून जलकुंभातून वाया जाणारे पाणी थांबविण्यात यश मिळाले.पंधरा दिवसांपुर्वी सिडकोतील खुटवडनगर येथील जलकुंभातूनही अशाच प्रकारे लाखो लिटर पाणी जलकुंभ ओव्हरफ्लो होवून वाया गेले होते. त्यावेळीही महापालिकेच्या कारभारावर टिका करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही त्यापासून बोध न घेता, महापालिकेचा गलथानपणा कायम राहिला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापुर धरणात अल्पसाठा असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे महापालिकाच आपल्या हक्काच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यास अपयशी ठरत असल्याच्या घटना चिंता वाढविणाºया आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक