शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात निकाल : युवतीच्या विनयभंगप्रकरणी एक वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 20:07 IST

महिनाभरापुर्वीच या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने पिडिता, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष आणि सबळ पुराव्यांअधारे राजू यास या गुन्ह्यात दोषी धरले.

ठळक मुद्देपिडितेने आरोपीला ठेवले होते घरात कोंडून

नाशिक : कोरोना काळात अंबड परिसरातील एका चाळीमधील घरात बळजबरीने शिरुन एका २३ वर्षीय युवतीचा हात पकडून स्वत:च्या अंगावर ओढून घेत स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला महिनाभरापुर्वी सुरु झाला. शनिवारी (दि.२०) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी.के.गावंडे यांनी आरोपी राजु दिलीप खताळे (रा.पाथर्डीफाटा) यास दोषी धरत एक वर्षाचा सश्रम कारावास व ४ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.अंबड पोलीस ठाणे हद्दीतील एका चाळीत राहणाऱ्या पिडितेच्या घरात २५ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपी राजू याने बळजबरीने प्रवेश केला होता. यावेळी घरात कोण अज्ञात व्यक्ती शिरला हे बघण्यसाठी आलेल्या पिडितेचा हात ओढून राजूने पलंगावर ओढले. अश्लील भाषेत संवाद साधत त्याने स्त्री मनाला लज्जा उत्पन्न करणारे कृत्य केले. यावेळी पिडितेने त्याच्या तावडीतून निसटत घराबाहेर पडून दरवाजाला बाहेरुन कडी लावून घेत पोलीस ठाणे गाठले. आरोपी राजू यास तिने घरात कोंडून ठेवले होते. अंबड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ पिडितेचे घर गाठून राजूला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याविरुध्द पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

तत्कालीन सहायक निरिक्षक जी.व्ही. शिंदे यांनी गुन्हा सिध्दतेसाठी कसोशिने तपास करत राजुविरुध्द सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. महिनाभरापुर्वीच या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने पिडिता, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष आणि सबळ पुराव्यांअधारे राजू यास या गुन्ह्यात दोषी धरले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगCourtन्यायालय