शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

निकालाची उत्कंठा शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 01:22 IST

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी करीत असलेल्या १४८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होणार असून, सकाळी ८ वाजेपासून सर्वच मतदारसंघांमध्ये मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.

नाशिक : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी करीत असलेल्या १४८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होणार असून, सकाळी ८ वाजेपासून सर्वच मतदारसंघांमध्ये मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी १२ वाजेनंतर निकाल हाती येण्यास सुरुवात होणार असले तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांवर पोलिसांनी निर्बंध लादले आहेत.अत्यंत चुरशीच्या व काही मतदारसंघांत अती-तटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्णातील पंधराही विधानसभा मतदारसंघांत मतदान घेण्यात आले. एकूण ४५ लाख ४४ हजार ६४१ मतदारांपैकी २८ लाख १७ हजार ९९७ मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्ह्णात सरासरी ६२.१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्याबरोबरच राजकीय पक्षांनीही निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी आवाहन केले होते. तरीदेखील २०१४च्या तुलनेत दोन टक्क्याने मतदान घटले. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे २००९ प्रमाणेच यंदा कॉँग्रेस आघाडी व महायुती अशी सरळसरळ लढत झाली. काही मतदारसंघांमध्ये महाराष्टÑ नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडीबरोबरच काही अपक्षांनीही निवडणुकीत रंगत आणली होती. त्यामुळे कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी व बहुरंगी लढती झाल्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस पहावयास मिळाली. त्याचबरोबर निवडणूक प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले होते. सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रात्रीचा दिवस करून प्रचारात स्वत:ला झोकून देत मतदानानंतर आपणच विजयी होऊ, असा दावा केला असला तरी त्याचा फैसला गुरुवारी होणार आहे.दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वच उमेदवारांचे कल जाहीर होणारगुरुवारी सकाळी ८ वाजता प्रत्येक मतदारसंघाच्या मुख्यालयी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणीस सुरुवात करण्यात येणार असून, प्रारंभी निवडणुकीच्या कामात नेमलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी केलेल्या टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाईल.निवडणूक निरीक्षक व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष स्ट्रॉँगरूमचे सील काढण्यात येऊन मतपेट्या मोजणीसाठी प्रत्येक टेबलावर देण्यात येईल. साधारणत: पहिली फेरी जाहीर करण्यासाठी ४० मिनिटे लागतील, त्यानंतर मात्र प्रत्येक फेरीसाठी २० मिनिटे लागतील. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वच उमेदवारांचा कल जाहीर होणार असून, आघाडी, पिछाडी पाहून उमेदवार दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यास मोकळे होतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Result Dayपरिणाम दिवसElectionनिवडणूकNashikनाशिक