शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 19:00 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केलेली आहे. परंतु, सतत येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके हिरवीगार असली तरी टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देराजापूर : शेतकरी पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडला संकटात

अनिल अलगटराजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केलेली आहे. परंतु, सतत येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके हिरवीगार असली तरी टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. औषधांवर शेतकऱ्यांच्या खर्च वाढला आहे. राजापूरच्या काही भागात विहिरींना अजूनही पाणी उतरले नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी पावसाळ्याचे दोन महिने होत आले तरीही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केसुद्धा अजून पाऊस झालेला नाही. राजापुरच्या काही भागात विहिरींना पाणी आहे, तर काही भागातील विहिरींनी तळ गाठलेला आहे.अधूनमधुन येणाऱ्या हलक्या सरींनी अस्तित्व दाखवल्याने पिकं जोमाने दिसत आहेत; पण मका, बाजरी, कपाशी या पिकांना पावसाची नितांत गरज असून दमदार पाऊस केव्हा होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.मागील वर्षाप्रमाणे यंदा पावसाची स्थिती चांगली राहील असे भाकीत हवामान खात्याने केले होते; पण हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रक बिघडले असून राजापूर व परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने छोटेमोठे नाले, बंधारे आजही कोरडेठाक आहेत.येवला तालुक्यातील पूर्व भागाचे भवितव्य हे निसर्गावरच अवलंबून असून, येथे कुठल्याही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही.दरवर्षी कितीही पाऊस झाला तरी या भागाला टंचाई असते. दररोज ढगाळ वातावरण व थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके तरारली आहे. परंतु, विहिरींना पाणी उतरले नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, तो मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने टोमॅटो पीक वाचविण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत. टोमॅटो पिकावर करपा व काळा ठिपका आला असल्याने पन्नास टक्के उत्पादन घटणार आहे यात शंका नाही.यावर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत चांगला पाऊस होईल असा ताजा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकऱ्यांचे हवामान खात्याकडे लक्ष आहे. त्यामुळे दोन महिन्यांत चांगला पाऊस होण्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांना पावसाची आशा लागली आहे.टोमॅटो पिकाला सध्या तरी बाजारभाव लक्षात घेऊन शेतकरी टोमॅटो पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक त्या औषध फवारणीवर खर्च करीत आहे. टोमॅटो पीक.

नाशिक जिल्ह्यात यावर्षी टोमॅटो लागवड जास्त प्रमाणात झालेली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती