शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

शहरातील १५९ झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण अत्यल्प दिलासा : स्वच्छतेच्या पालनात वाढ; प्रतिकारशक्तीही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 00:47 IST

नाशिक : महानगरातील शासकीय भूखंड, मनपाच्या जागा, कॅनॉललगतच्या जागांवर झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात असून सध्या शहरात तब्बल १५९ झोपडपट्ट्या आहेत.

नाशिक : महानगरातील शासकीय भूखंड, मनपाच्या जागा, कॅनॉललगतच्या जागांवर झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात असून सध्या शहरात तब्बल १५९ झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये गतवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोरोनाने थैमान घातल्याने झोपडपट्ट्यांमधील रुग्णसंख्या ३ हजारांवर पोहोचली होती. मात्र, आता कोरोनाचे घटलेले प्रमाण, स्वच्छता पालनातील वाढ तसेच नागरिकांच्या प्रतिकारशक्तीतही वाढ झाल्याने झोपडपट्टी परिसरातील रुग्णसंख्या ३५७वर पोहोचली आहे.महापालिकेच्या जागांवर अधिकृत आणि अनधिकृत अशा दोन्ही प्रकारच्या झोपडपट्ट्या आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी महापालिका भूतदयेने रस्ता, पाणी, गटारे अशा सर्वच सुविधा दिल्या आहेत. तसेच महापालिकेच्या वतीने नियमितपणे धुरळणी करण्यासह अन्य आरोग्यसंबंधित उपाययोजना तातडीने करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरात सध्या १५९ झोपडपट्ट्या असून, त्यातील १०२ झोपडपट्ट्या अधिकृत आहेत. तर ५७ झोपडपट्ट्या अनधिकृत आहेत. अनेक झोपडपट्टीतील रहिवाशांना घरकुल मिळूनदेखील पुन्हा त्याच ठिकाणी येणे किंवा अगोदरचे घर भाड्याने देण्याचे प्रकारदेखील घडतात. त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवासी संख्या कधीच घटत नाहीत. मात्र, आरोग्य उपाययोजनांमुळे गत तीन महिन्यात झोपडपट्टी भागात कोरोनाची रुग्णसंख्या नगण्य झाली आहे. महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागाच्या वतीने झोपडपट्ट्यांचे निर्मूलन होऊ शकलेले नाही. मात्र, महापालिकेचा वैद्यकीय विभाग आणि आरोग्य विभागाने सातत्याने धुराची फवारणी, रॅपिड अँटिजेन टेस्ट, घरपोच गोळ्या अशा सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करीत कोरोनावर बहुतांश प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळेच महानगरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या हजारापेक्षा कमी आली असून, सर्व यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळेच त्यांना हे यश मिळवणे शक्य झाले आहे.मल्हारखाण झोपडपट्टी - १३पंचशील नगर झोपडपट्टी - ०९भीमनगर झोपडपट्टी - १०आम्रपाली झोपडपट्टी - ०३फुलेनगर झोपडपट्टी - ११-----------जिल्ह्यातील एकूण रुग्ण - १ लाख १० हजार ३४६उपचारांनंतर बरे झालेले रुग्ण - १ लाख ६ हजार ६३२सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - १ हजार ७४२एकूण मृत्यू - १ हजार ९७२झोपडपट्टी भागातील रुग्ण - ३५७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या