शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुष्पवृष्टीत जमले ‘तुमचे-आमचे’

By admin | Updated: September 13, 2015 23:12 IST

शाहीपर्वणी : महापौर-सभापतींचा अवखळपणा

नाशिक : एखाद्या संस्थेने कार्यक्रम घेतला की, एका पदाधिकाऱ्याला प्रास्ताविक करायला सांगितले जाते, तर दुसऱ्याला सूत्रसंचालन करायला लावून समान संधी देण्याची कसरत पार पाडली जाते. सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त अशीच समान संधी महापौर आणि स्थायी समितीचे सभापती यांनी एकमेकांना सांभाळून घेत साधू-महंतांवर करण्यात येणाऱ्या पुष्पवृष्टीबाबत साधली. पुष्पवृष्टी करताना दोहोंमधील अवखळपणाही जागृत झाल्याचे भाविकांनी अनुभवले. सिंहस्थ कुंभमेळ्यातील ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळी पुरोहित संघाने महापौरांसह महापालिकेतील पदाधिकारी-नगरसेवकांना दिलेल्या अवमानकारक वागणुकीचे पडसाद उमटले होते. महासभेतही त्याबाबत पुरोहित संघासह भाजपावर प्रचंड टीका करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने या अपमानाचा वचपा काढण्यासाठी साधू-महंतांच्या आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्याचे यजमानपद स्वीकारले आणि कार्यक्रमात आपला मान मिरवून घेतला. शाहीपर्वणीच्यावेळी पुरोहित संघ अथवा भाजपेयींना श्रेय मिळू नये म्हणून महापालिकेने गोदावरी मंदिरावर खास मंडप टाकून घेतला आणि दोन्ही पर्वणीप्रसंगी या मंडपात मनपातील सत्ताधारी मनसेसह राष्ट्रवादी, कॉँग्रेस यांचेच पुढारी दिसून आले. प्रामुख्याने पालकमंत्र्यांसह आमदार व भाजपेयींनी मंडपात हाताची घडी घालून बसण्याऐवजी रामकुंडावर गोमुखाजवळ माध्यमांसमोर झळकणे पसंत केले. पहिल्या पर्वणीला महापालिकेमार्फत महापौरांनी रामकुंडात स्नानासाठी येणाऱ्या साधू-महंतांच्या माथ्यावर पुष्पवृष्टीचे कर्तव्य पार पाडले होते. मात्र, दुसऱ्या पर्वणीदरम्यान बहुधा समान संधीवरून काही तरी बिनसले असावे म्हणूनच की काय स्थायी समिती सभापतींसाठी थेट गोमुखाजवळच पुष्पवृष्टीसाठी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.