शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा कोविड सेंटरमध्ये दाखल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 01:10 IST

कोरोना संसर्गाचा प्रसार कमी होण्यासाठी आणि गृहविलगीकरणात आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील अशा बाधित व नव्याने बाधित झालेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी न देता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देभुजबळ : निफाडसह येवला तालुक्याचा घेतला आढावा

येवला : कोरोना संसर्गाचा प्रसार कमी होण्यासाठी आणि गृहविलगीकरणात आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील अशा बाधित व नव्याने बाधित झालेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी न देता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.येवला विश्रामगृहात कोरोना सद्य:स्थिती, उपाययोजना व लसीकरण मोहीम याबाबत निफाड व येवला तालुक्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. कोरोनाच्या प्रादुर्भावासोबतच म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्णदेखील अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. याकरिता कोरोनाबाधित व कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी म्युकरमायकोसिस या आजारापासून स्वत:ची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी. येवला तालुक्यात कान, नाक व घसा तज्ज्ञ नसल्याने म्युकरमायकोसिसचे बाधित  रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने नाशिकला उपचारासाठी पाठविण्यात यावे. त्याचप्रमाणे लासलगाव येथील कोविड सेंटर तातडीने सुरू करण्यात यावे.  नगरपालिकेने पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. दरम्यान, भुजबळ यांनी शहरात प्रत्यक्ष पाहणी करत निर्बंधांचाही आढावा घेतला. विंचूरला कोविड सेंटरचे लोकार्पण विंचूर येथील देवकी लॉन्स येथे उभारण्यात आलेल्या ५० बेडच्या कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्यात आले. या कोविड केअर सेंटरमध्ये एकूण २५ ऑक्सिजन व २५ साधारण बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली असून, रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळcorona virusकोरोना वायरस बातम्या