शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ विद्यार्थिनीला मिळाले पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:25 IST

खडतर प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने शिक्षण घेत असलेल्या येथील प्रगती शिक्षण संस्थेच्या प्रगती माध्यमिक विद्यालयातील रेणुका दिलीप खैरनार या होतकरू विद्यार्थिनीचे पालकत्व स्वीकारून इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनच्या अध्यक्ष स्मिता येवला यांनी रेणुकाला मातृत्व देत शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे.

ठळक मुद्देसटाणा : इनरव्हील क्लब अध्यक्षांचा पुढाकार

सटाणा : खडतर प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने शिक्षण घेत असलेल्या येथील प्रगती शिक्षण संस्थेच्या प्रगती माध्यमिक विद्यालयातील रेणुका दिलीप खैरनार या होतकरू विद्यार्थिनीचे पालकत्व स्वीकारून इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनच्या अध्यक्ष स्मिता येवला यांनी रेणुकाला मातृत्व देत शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे.इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनच्या वर्धापन दिनानिमित्त प्रगती विद्यालयात विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी स्मिता येवला, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण येवला, शिक्षणाधिकारी पी. पी. महाजन, समको बँकेच्या माजी अध्यक्षा रूपाली कोठावदे, सचिव रूपाली जाधव, मुख्याध्यापक एस. बी. कोठावदे, अतुल अमृतकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीमती येवला यांनी रेणुकाचे फक्त शैक्षणिकदृष्ट्या पालकत्व स्वीकारत नसून तिला वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. सचिव रूपाली जाधव, रामकृष्ण येवला यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक अमृतकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्र मास क्लबच्या सदस्य संगीता खानकरी, रु पाली निकुंभ, रेखा वाघ, सुजाता पाठक, पूनम अंधारे, रूपाली पंडित, साधना पाटील, रंजिता मोरे, योगीता देवरे, सुनीता धोंडगे, एम. टी. म्हसदे, एन. एम. सोनजे, के. ए. गुंजाळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ए. पी. केदारे यांनी तर श्रीमती व्ही. झेड. भामरे यांनी आभार मानले.इयत्ता नववी व दहावीपर्र्यंतच्या शिक्षणाचे पालकत्वआई-वडील नसलेल्या रेणुकाचे इयत्ता नववी व दहावीपर्र्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व क्लबच्या अध्यक्ष स्मिता येवला यांनी स्वीकारून मातृत्व मिळवून दिले. पाच वर्षांपूर्वी अपघातामध्ये रेणुकाचे वडील तर आजारपणामुळे तिच्या आईचे निधन झाले आहे. सध्या ती कोटबेल (ता.बागलाण) येथील बहिणीकडे वास्तव्यास आहे. शाळेकडून रेणुकाला शिक्षणासाठी वेळोवेळी मदतही केली जात असते.

टॅग्स :Socialसामाजिक