शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मूळ लाभार्थी धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:05 IST

इगतपुरी तालुक्यातील तहसील पुरवठा विभागामार्फत वितरित होणाऱ्या धान्यवाटप अंत्योदय यादी व प्रत्यक्ष वाटप यादी यात मोठी तफावत असल्याचा मोठा घोळ समोर आला आहे. सदर नांदूरवैद्य विभागातील दोन्ही याद्या तहसील पुरवठा विभागातून माहितीचा अधिकार २००५ अन्वये माहिती अधिकार कार्यकर्ते महेश गायकवाड यांना प्राप्त झालेल्या आहेत.

ठळक मुद्देअंत्योदय यादीतील प्रत्यक्ष धान्यवाटपात तफावत

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील तहसील पुरवठा विभागामार्फत वितरित होणाऱ्या धान्यवाटप अंत्योदय यादी व प्रत्यक्ष वाटप यादी यात मोठी तफावत असल्याचा मोठा घोळ समोर आला आहे. सदर नांदूरवैद्य विभागातील दोन्ही याद्या तहसील पुरवठा विभागातून माहितीचा अधिकार २००५ अन्वये माहिती अधिकार कार्यकर्ते महेश गायकवाड यांना प्राप्त झालेल्या आहेत.दोन्ही याद्यांमध्ये तफावत असल्याचे लक्षात येताच पुढील माहिती कार्यवाहीसाठी राज्य माहिती आयोग खंडपीठ, नाशिक यांच्याकडे गायकवाड यांनी द्वितीय अपील दाखल केले आहे. इगतपुरी तालुक्यातील पुरवठा विभागामार्फत अंत्योदय कुटुंबातील लाभार्थींना ३५ किलो धान्य स्वस्त दरात वितरित होत असते. प्रत्यक्षात गरजवंताला लाभ मिळण्याऐवजी श्रीमंतांची नावे अंत्योदय यादीत सामाविष्ट करण्यात आलेली आहेत. ती नावे अंत्योदय यादीत सामाविष्ट झालीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रत्यक्ष लाभार्थी, गरजवंत स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित होत असताना श्रीमंत व्यक्तींची नावे अंत्योदय यादीत आल्याने खरे लाभार्थी शासनाच्या स्वस्त धान्य मिळण्यापासून दूर राहिले आहेत. अस्वली स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते महेश गायकवाड यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये इगतपुरी तहसील पुरवठा विभागात अस्वली स्टेशन व नांदूरवैद्य येथील अंत्योदय यादीची माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष अंत्योदय यादी व धान्यवाटप झालेली अंत्योदय कुटुंबाची यादी यात खूप मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे.याबाबत चौकशी करण्यासाठी राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले आहे. या प्रकरणामुळे मुख्य लाभार्थी धान्य घेण्यापासून वंचित राहत असून, याचा फायदा श्रीमंत असणाºया व्यक्तीला होत असल्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे इगतपुरी तहसीलदारांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार