नाशिक : मनुष्याला सर्व चिंतांपासून मुक्ती मिळावी, तसेच जीवनाचा खरा अर्थ शिकवणारी आणि खरा मार्ग दाखवण्यासाठी रामकथा समितीद्वारे मोरारीबापू यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे.सिंहस्थानिमित्त शनिवार (दि. ५) पासून रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वधर्मीय भाविकांना आस्वाद घेता यावा यासाठी मोरारीबापू हिंदी भाषेतून निरूपण करणार आहेत, अशी माहिती नरेंद्र ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या रामकथेचे आयोजन दि ठक्कर डोम, ठक्कर इस्टेट, लवाटेनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथे आयोजित करण्यात आलेली मोरारीबापू यांची ही ७६१वी रामकथा असणार आहे. या कथेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी शहरातील विविध भागांतून परिवहन महामंडळाच्या मोफत बसेसची सेवा रामकथा समितीद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
मोरारीबापू यांच्या रामकथेचे आयोजन
By admin | Updated: September 4, 2015 00:34 IST