या रक्तदान शिबिरात भारतीय स्वातंत्र्याच्या प्रत्येक वर्षासाठी एक अशा ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन नेहरू युवा केंद्र नाशिक जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी, कोषाध्यक्ष सुनील पंजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतील शिवाजी लहारे, मंगेश राठोड, सचिन माने तसेच इतर सहकाऱ्यांनी सेवा बजावली. याप्रसंगी येवला तालुका पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, स्वराज इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष कैलास दुघड, सावली समाजसेवी बहुद्देशीय संस्था पाटोदाचे अध्यक्ष परसराम शेटे, उपाध्यक्ष मच्छिंद्र काळे, खजिनदार पंकज मढवई, ग्रामसेविका वैशाली पुरी, निवृत्त सैनिक गोपीचंद गांगुर्डे, सैन्यदलात सेवा बजावत असलेले बाळू कदम, महिला भगिनी सुनीता कदम, रंजना पेंढारे, कृषिदूत सौरभ कदम, संग्राम ढोमसे व इतर ग्रामस्थांनी भेट दिली.
रक्तदान शिबिराचे आयाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST