नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत विविध कामगार-कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून, मंगळवारी (दि.३) सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन बुधवारी (दि.४) दुपारी आयुक्तांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. आयुक्तांकडून प्रतिसाद न मिळाल्यास मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. म्युनिसिपल कामगार-कर्मचारी सेनेच्या दालनात सर्व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक होऊन निषेध करण्यात आला. चर्चेतून काहीही निष्पन्न न झाल्यास प्रत्येक विभागीय कार्यालयांवर द्वारसभांचे नियोजन करण्याचे आणि राजीव गांधी भवनवर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले. बैठकीला म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे, माजी महापौर अशोक दिवे, सफाई कामगार संघटनेचे सुरेश दलोड, सुरेश मारू, किशोर घाटे आदी उपस्थित होते.
आयुक्तांविरोधात संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:15 IST
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत विविध कामगार-कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या.
आयुक्तांविरोधात संघटना आक्रमक
ठळक मुद्देआयुक्तांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आलेपदाधिकाºयांची बैठक होऊन निषेध करण्यात आला