शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 01:03 IST

कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्यांचा अधिकाधिक नागरिकांशी संपर्क येतो, अशा व्यावसायिकांची, सेवा पुरवठादारांची तसेच सर्वाधिक जनसंपर्क असणाऱ्यांची प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने कोरोना चाचणी घेण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

नाशिक : कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्यांचा अधिकाधिक नागरिकांशी संपर्क येतो, अशा व्यावसायिकांची, सेवा पुरवठादारांची तसेच सर्वाधिक जनसंपर्क असणाऱ्यांची प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने कोरोना चाचणी घेण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.नजीकच्या काळात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी शक्यतो सर्व प्रकारच्या  उपाययोजना करण्याचे आदेश  देण्यात आले आहेत. त्यात महानगरासह सर्व कापड व इतर जीवनावश्यक पुरवठा दुकानदार, मेडिकल स्टाेअर, हॉटेल मालक व त्यांचे कर्मचारी, दूधवाला, घरकाम मोलकरीण, टपरीवाले, हातगाडी वर वस्तू विकणारे, भाजीपाला व्यवस्थापक, सर्व माध्यमांचे प्रतिनिधी यांची दर आठवड्याला कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जोखीमग्रस्त सर्व घटकांनी कोरोना लसीकरण आपापल्या सोयीनुसार नजीकच्या केंद्रावर करून घेण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागाला तत्काळ माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय कुटुंबातील व्यक्तींची व दरम्यानच्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची खरी माहिती पुरविणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अधिक जनसंपर्क असणाऱ्या व्यावसायिक गटांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाकडून कोणत्या व्यावसायिकांचे लसीकरण करायचे त्याबाबत स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याशिवाय घरगुती सेवा पुरवणाऱ्यांपैकी दूध घरपोच पोहोचवणारे दूध विक्रेते, घरगुती काम करणाऱ्या मोलकरणी, घरगुती नोकर, गॅस सिलिंडर वाटप करणारे कर्मचारी,  तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर, कंडक्टर आणि अन्य कर्मचारी, यांचा त्यात समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.खासगी दवाखान्यांनाही निर्देश खासगी दवाखान्यांनी सर्व संशयित रुग्णांची माहिती प्रशासनास तत्काळ द्यावी व चाचणीबाबत तपासणीचा आग्रह करण्यात आला आहेे. केवळ एचआरसीटी तपासणी करून सीटी स्कोअर वाढला आहे म्हणून उपचार करत शासनाची दिशाभूल करू नये. त्यामुळे संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह असला तर त्याच्या सहवासातील व्यक्ती, संबंधित व्यक्ती प्रसार करणे सुरूच राहणार असल्याने तसे करणे टाळावे, असे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या