कळवण : अनुसूचित जाती जमातीच्या मुलामुलींना उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शासनाने सुरूकेलेल्या शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे जीवनमान धोक्यात आल्याचे सहायक जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांना रामेश्वर येथील आश्रमशाळा भेटीदरम्यान निदर्शनास आले. त्यांनी मुख्याध्यापकाची वेतनवाढ बंद तसेच गैरहजर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले आहेदेवळा तालुक्यातील रामेश्वर शासकीय आश्रमशाळेला आज सकाळी पाण्डेय यांनी अचानक भेट दिली असता मुख्याध्यापक व शिक्षक, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने निदर्शनास आले. वेतन बंद करण्याचे आदेश देताना यापुढे कर्मचारी गैरहजर आढल्यास निलंबनाची कारवाई करण्याचे सुतोवाच त्यांनी केले. भेटीदरम्यान फक्त एक प्राथमिक शिक्षक व दोन माध्यमिक शिक्षक उपस्थित असल्याचे त्यांना आढळून आले. वर्ग ३ चे १० कर्मचारी गैरहजर तर ४ मुख्यालयात राहात नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी बागलाण तालुक्यातील लाडूद येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. (वार्ताहर)