शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्याचे स्थायी समिती सभापतींचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:51 IST

बैठकीत चर्चा : चुकीच्या सर्वेक्षणावर कारवाईला आक्षेप

ठळक मुद्दे८ नोव्हेंबरपासून सुमारे १५० अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईरस्त्यात अडथळा नसलेल्या धार्मिक स्थळांनाही नोटिसा

नाशिक : महापालिकेमार्फत येत्या ८ नोव्हेंबरपासून सुमारे १५० अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र, सदर धार्मिक स्थळांबाबत चुकीचे सर्वेक्षण झाल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर अनधिकृत धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला दिले.स्थायी समितीच्या बैठकीत शशिकांत जाधव यांनी अनधिकृत धार्मिक स्थळांच्या कारवाईबाबत शंका उपस्थित केल्या. जाधव यांनी सांगितले, रस्त्यात अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविली पाहिजे. परंतु, रस्त्यात अडथळा नसलेल्या धार्मिक स्थळांनाही नोटिसा चिकटविण्यात आल्या आहेत. पपया नर्सरीजवळील मंदिराला नोटीस बजावताना लगतच असलेल्या पोलीस चौकीवरही कारवाई करणार काय, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. सूर्यकांत लवटे यांनीही देवळाली गाव येथील गावठाण भागातील खासगी जागांमधील शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या जुन्या धार्मिक स्थळांना नोटिसा देण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. चर्चेनंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यांमध्ये अडथळा ठरणाऱ्या  अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई व्हायलाच हवी; परंतु प्रशासनाच्या सर्वेक्षणात काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त झाल्या पाहिजेत. त्यासाठी अनधिकृत धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश सभापतींनी दिले. बैठकीत एकाच प्रभागात क्रीडा साहित्यासाठी राखीव निधी देण्यासही सदस्यांनी आक्षेप घेतला. मुकेश शहाणे, वत्सला खैरे यांनी सदर निधीचे समसमान वाटप करण्याची सूचना मांडली. त्यावर सभापतींनी सर्व प्रभागांसाठी निधीचे समान वाटप करण्याचे आदेश दिले.पेस्टकंट्रोलचा ठेका रद्द कराशहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. पेस्टकंट्रोलचा ठेकाच रद्द करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी अटी-शर्तीनुसार ठेकेदाराकडून काम होत नसल्याने ठेका रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. शिवाय, याबाबत आपण लेखी पत्रही आयुक्तांना देणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाNashikनाशिक