शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिले कमी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 18:11 IST

न वापरलेल्या विजेची बिले कृषी पंपधारकांकडून चौकशीची मागणी या संदर्भातले वृत्त ‘लोकमत’मध्ये (दि. ११) प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धावपळ उडाली.उपकार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांनी संबंधित कारकुनास पाचारण करून विना वीज कालावधीतील बिले रद्द करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देवीज वितरणकडून दखल माणिकपुंज परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान

नांदगाव : न वापरलेल्या विजेची बिले कृषी पंपधारकांकडून चौकशीची मागणी या संदर्भातले वृत्त ‘लोकमत’मध्ये (दि. ११) प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धावपळ उडाली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी येथील वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन उपकार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांना याविषयी जाब विचारला.सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर साळुंके यांनी संबंधित कारकुनास पाचारण करून विना वीज कालावधीतील बिले रद्द करण्याचे आदेश दिले.

आधी कवडे यांना तुमचे बिल आम्ही कमी केले आहे ना? अशी मखलाशी करून शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कवडे यांनी माणिकपुंज धरणातून शेतीसाठी पाणी उचलणाºया सर्व शेतकºयांचे सदर कालावधीतील बिल का आकारू नये याविषयी वस्तुस्थिती मांडली. लोकमतमध्ये छापून आलेल्या वृत्ताचा संदर्भ दिला. तेव्हा साळुंके यांनी जे शेतकरी आमच्याकडे येतील त्यांची बिले कमी करून देऊ असे सांगितले; परंतु तुमची चूक आहे. तुमच्या पातळीवर सर्वांचीच बिले कमी करण्यात यावी, असे त्यांना स्पष्ट केले.जुलै ते नोव्हें. २०१७ या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता; मात्र खंडित कालावधीची बिले अदा करण्यात आली. बिलात १० अश्वशक्तीच्या पंपासाठी १२ हजार रु . चार्ज करण्यात आले होते. असे सुमारे २०० ते ३०० पंप आहेत. याचा गौप्यस्फोट लोकमतने केला. यंदा सरासरीपेक्षा २५ टक्केच पाऊस झाला आहे. परतीच्या पावसानेही दगा दिला आहे. त्यामुळे माणिकपुंज धरणातील संपूर्ण पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावे, अशी जनतेची मागणी आहे. तथापि कागदोपत्री अद्याप तसे करण्यात आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने वीज वितरण कंपनी व जलसंपदा विभाग यांना डोळ्यात तेल घालून पाणी अनाधिकाराने उचलण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नये असे आदेश काढावेत, अशी मागणी कवडे यांनी केली आहे. तसेच शहरात तीन दिवसांपासून विजेचे भारनियमन सुरू असून, शहरात दोन भागात वेगवेगळ्या निकषाने आठ तासांपेक्षाही अधिक वेळ भारनियमन करण्यात येत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

टॅग्स :electricityवीजbillबिल