बालकांच्या कोविडसाठी आधीच औषधांची मागणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 02:17 AM2021-05-25T02:17:14+5:302021-05-25T02:17:35+5:30

कोराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना अगोदरचा अनुभव लक्षात घेता बालकांवर उपचारासाठी लागणारी औषधे आणि इंजेक्शन नंतरच्या काळात अपुरी पडू नये यासाठी आताच मागणी नोंदवावी तसेच व्हेंटिलटरदेखील तातडीने खरेदी करून संभाव्य धोका टाळावा, अशी सूचना बालरेाग तज्ज्ञ आणि अन्य वैद्यकीय व्यावसायिकांनी महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे तर बाल रुग्णालयांना कोविड उपचारासाठी लागणारे साहित्य तसेच परवानगी देताना सहकार्य केले जाईल, त्याचबरोबर आता तातडीने हेल्पलाईन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महापौरांनी केली आहे. 

Order medicines in advance for baby covid | बालकांच्या कोविडसाठी आधीच औषधांची मागणी करा

बालकांच्या कोविडसाठी आधीच औषधांची मागणी करा

Next
ठळक मुद्देबालरोग तज्ज्ञांची मागणी : महापौरांनी घेतली पूर्वतयारी बैठक

नाशिक : कोराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना अगोदरचा अनुभव लक्षात घेता बालकांवर उपचारासाठी लागणारी औषधे आणि इंजेक्शन नंतरच्या काळात अपुरी पडू नये यासाठी आताच मागणी नोंदवावी तसेच व्हेंटिलटरदेखील तातडीने खरेदी करून संभाव्य धोका टाळावा, अशी सूचना बालरेाग तज्ज्ञ आणि अन्य वैद्यकीय व्यावसायिकांनी महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे तर बाल रुग्णालयांना कोविड उपचारासाठी लागणारे साहित्य तसेच परवानगी देताना सहकार्य केले जाईल, त्याचबरोबर आता तातडीने हेल्पलाईन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महापौरांनी केली आहे. 
महापौर सतीश कुलकर्णी यांनी शहरातील बालरोग तज्ज्ञांची बैठक घेतली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविष्ट आष्टीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. कल्पना कुटे, आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
पालक, प्रौढ नागरिक आणि शिक्षक यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करावे, दुसरी बाब म्हणजे बालकांच्या कोविडवरील उपचारासाठी लागणारी औषधे आणि व्हेंटिलेटर्सची आताच मागणी नोंदवून ठेवावी तसेच पुरेशा ऑक्सिजनची सोय करावी जेणेकरून ऐनवेळी संकट येणार नाही तसेच औषधांची टंचाई होणार नाही त्याचप्रमाणे आधी यासंदर्भात जनजागृती करावी अशाप्रकारची मागणी व्यवसायिकांनी केली. 
या बैठकीस आयएमएच्या सेक्रेटरी कविता गाडेकर, बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या सेक्रेटरी डॉ. रिना राठी, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. मिलिंद भराडिया, डॉ. सागर सोनवणे, डॉ. संजय आहेर, डॉ. नितीन सुराणा, डॉ. श्रेयस गायधनी डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. नवीन बाजी, डॉ. शलाका बागुल, डॉ. ललित बागुल, डॉ. विनोद पावस्कर आदी उपस्थित होते.
हेल्पलाइन करणार
nमहापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेकडून पुरेशा औषध साठ्याची व्यवस्था करताना कोरोना  कसा टाळता येईल तसेच भीतीचे वातावरण घालवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. कोरोनाबाधितांवर उपचार करताना कोविड आणि नॉन कोविड असे दोन भाग करावेत, असे त्यानुसार नियोजन करावे, असे सांगितले तर डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी  बालकांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सेवकांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी वैद्यकीय व्यवसायिकांनी त्रिसूत्री मांडली. 

Web Title: Order medicines in advance for baby covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.