शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

जिल्हा रुग्णालयातील स्थिती सुधारण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:18 IST

आरोग्य विभागाची राष्ट्रस्तरीय समिती जिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी बुधवारी (दि.१८) जिल्हा रुग्णालयाच्या विविध कक्षांना भेट देत पाहणी करून कामकाजाचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

नाशिक : आरोग्य विभागाची राष्ट्रस्तरीय समिती जिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी बुधवारी (दि.१८) जिल्हा रुग्णालयाच्या विविध कक्षांना भेट देत पाहणी करून कामकाजाचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्या. तुटलेले दरवाजे, जिन्यातील भिंतीचे ‘लाल’ झालेले कोपरे, खिडक्यांच्या फुटलेल्या काचांसह कक्षांमधील बेडसीटसह अन्य साधनांची दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी व्यवस्थापनाला दिले.जिल्हा रुग्णालयातून रुग्णांना मिळणाºया वैद्यकीय सुविधांची गुणवत्ता व दर्जा तपासण्यासाठी येत्या काही दिवसांत राष्टÑीयस्तरावरील समिती शहरात लवकरच येऊन धडकणार आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आहे. समितीच्या पाहणीत कुठल्याही प्रकारची उणीव भासणार नाही, याची काळजी व्यवस्थापनाकडून घेण्यास सुरुवात झाली आहे.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यासह रुग्णालयातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जगदाळे यांनीही रुग्णालयाच्या विविध विभागप्रमुखांना आवश्यक त्या सूचना बैठकीत दिल्या आहेत.सध्या आठवडाभरापासून जिल्हा रुग्णालयाबाहेर रस्त्यालगत भुयारी गटारीचे खोदकाम सुरू असल्यामुळे रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्याची दुर्दशा झाली आहे. यामुळे प्रवेशद्वारावर रुग्णवाहिकांना बसणारा ‘झटका’ तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कायमस्वरूपी दूर करावा लागणार आहे.रावखंडे यांनी बाह्य रु ग्ण विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, प्रसूती कक्ष, प्रसूती गृह, शल्यचिकित्सा कक्ष, पुरुष शल्य विभाग, शवविच्छेदन कक्षाला भेट दिली. आरोग्य विभागाकडून रुग्णालयातील कामे मार्गी लावण्यासाठी बांधकाम विभागाकडे एक कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे, तरीदेखील या विभागाकडून मात्र रुग्णालयातील कामे आटोपती घेण्यास प्राधान्य दिले जात नसल्याचे चित्र आहे.कामे तातडीने मार्गी लावावीतअनेक विभागांत दरवाजे तुटले असून, खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. काही ठिकाणी फरशा उखडल्या आहेत. याशिवाय टाईल्सही फुटल्याचे पाहणीत आढळून आले. विविध कक्षांमधील शौचालय, प्रसाधनगृहांची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे रावखंडे यांनी राष्टÑीय समितीच्या पाहणीत असे ‘चित्र’ रुग्णालयाचे दाखवायचे आहे का? असा रोखठोक सवालही भेटीदरम्यान केला. तत्काळ देखभालदुरुस्ती, स्वच्छताविषयकची सर्व ती कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashikनाशिक