शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

रेल्वेस्थानकातील कामे पूर्ण करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:41 IST

भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी बुधवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात पाहणी करून विविध कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच सिन्नरफाटा येथील संरक्षक भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली.

नाशिकरोड : भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी बुधवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात पाहणी करून विविध कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच सिन्नरफाटा येथील संरक्षक भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली.  भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर.के. यादव व इतर विविध विभागाचे अधिकारी यांनी बुधवारी दुपारी प्लॅटफॉर्म एकवरील वेटिंग रूम, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, स्थानक परिसर आणि रेल्वे रूळातील स्वच्छता, पिण्याचे पाणी आदींची पाहणी केली. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक २, ३ व ४ ची पाहणी करून स्वच्छता, मार्गदर्शक फलकाबाबत सूचना केल्या. यावेळी काही प्रवाशांशीदेखील यादव यांनी संवाद साधला.  कुंभमेळ्यात चौथा प्लॅटफार्म बांधण्यात आला असून सिन्नरफाटा, स्टेशनवाडी भागातून रेल्वेस्थानकात अनधिकृत फेरीवाले आदी प्रवेश करतात. त्यामुळे प्रवासी आणि रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत अडचण निर्माण होत आहे. सिन्नर फाटा भागात रेल्वे प्रशासनाकडून आठ फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. भिंत बांधण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे; मात्र प्रवासी, रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेऊन संरक्षक भिंतीचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश यादव यांनी दिले.  यावेळी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनीलकुमार मिश्रा, मंडल वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी, स्टेशन प्रबंधक आर. के. कुठार, मुख्य वाणिज्य अधिकारी कुंदन महापात्रा, अभियंता विद्युत एस. जी. सय्यद, वरिष्ठ मंडल अभियंता अनिलकुमार सिंग, विद्युत अभियंता प्रवीण पाटील, टेलिकम्युनिकेशनचे चव्हाण, सय्यद, रेल्वे सुरक्षा दलाचे दुय्यम पोलीस निरीक्षक बी.एस.झगडे, मुख्य पार्सल पर्यवेक्षक के. व्ही. अखिलकर, तिकीट बुकिंग प्रमुख एम. पी. डोके, मुख्य तिकीट तपासणीस आर. के. जैन, ए. ए. पटेल आदी उपस्थित होते.संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याच्या सूचनानाशिकरोड रेल्वे स्थानकात पाहणी करून विविध कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच सिन्नरफाटा येथील संरक्षक भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. प्लॅटफॉर्म एकवरील वेटिंग रूम, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, स्थानक परिसर आणि रेल्वे रूळातील स्वच्छता, पिण्याचे पाणी आदींची पाहणी केली. तसेच विविध विभागप्रमुखांशी समस्यांबाबत चर्चा केली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेNashikनाशिक