शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे आदेश

By admin | Updated: June 24, 2014 00:25 IST

सुरगाणा : तालुक्यातील पाणीटंचाईस जबाबदार ठरलेल्या संबंधित एजन्सीवर त्वरित गुन्हे दाखल करावेत अशी स्पष्ट सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी आढावा बैठकीत केली.

सुरगाणा : तालुक्यातील नळपाणीपुरवठा योजना अपूर्ण व रखडवून ठेवून पाणीटंचाईस जबाबदार ठरलेल्या संबंधित एजन्सीवर त्वरित गुन्हे दाखल करावेत अशी स्पष्ट सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी आयोजित तालुक्यातील विविध विकास -कामांच्या आढावा बैठकीत केली. पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीस तहसीलदार रशिद तडवी, नितीन पवार यांच्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.या आढावा बैठकीत उपस्थित वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्रस्त असलेल्या उपस्थितानी चांगलेच धारेवर धरले. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी केवळ कोटेशन भरले आहेत. त्यांना अद्यापही वीजजोडणी करून मिळालेली नाही. तरीदेखील त्यांना न चुकता दर महिन्याला देयके प्राप्त होत असून अनेकांनी वीजजोडणी नसताना वीजदेयके भरली असल्याने उपस्थितांनी यावेळी प्रचंड रोष व्यक्त केला. सहा तासांचे भारनियमन असताना १२ ते १३ तास भारनियमन तालुक्यात होत असल्याचे सांगण्यात आले. उंबरठाण परिसरात तब्बल ७८ गावे पाडे अंधारात असल्याचे सांगण्यात येऊन वीज खाबांची मागणी करण्यात आली. विजेचे खांब संबंधित एजन्सी स्वत: न देता तेथील ग्रामस्थांना घेऊन जाण्यास सांगत असल्याचीही तक्रार यावेळी करण्यात आली. रात्री लोक झोपल्यानंतर वीज येते. वीजपुरवठा सुरळीत असावा. वादळामुळे जमीनदोस्त झालेले विद्युत पोल त्वरित उभे केले जावेत, कर्मचारीच्या रिक्त जागा भरल्या जाव्यात, वेळेत वीजजोडणी दिले जावे, अशी मागणी आढावा बैठकीत करण्यात आली.तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई सुरू आहे. काही गावांचे प्रस्ताव फेब्रुवारीत देऊनही वरिष्ठ स्तरावरुन पाणी टँकर वेळेत मिळण्यास दिरंगाई करण्यात आली. पाणी टँकर वेळेत तर मिळाले नाहीच पण जे टँकर आले ते अतिशय जुनाट व केव्हाही नादुरुस्त होऊ शकतात, असे टँकर दिलेत. अपूर्ण व रखडलेल्या नळपाणी पुरवठा योजनेबाबत संताप व्यक्त झाला. २००७ व ०८ मधील काही योजना अद्यापही अपूर्ण असून, ज्या काही नळपाणी पुरवठा योजना अपूर्ण अहेत त्यास जबाबदार असणाऱ्या संबंधित एजन्सीवर गुन्हे दाखल करा, अशी सूचना पवार यांनी दिली. शिक्षण विभागातील रिक्त जागा भरल्या जाव्यात. वर्षानुवर्षे परागंदा झालेल्या शिक्षकांच्या जागा भरल्या जाव्यात. मिटिंगचे नाव करुन दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई व्हावी, शाळांमध्ये विद्युतीकरण व्हावे मॉडेल स्कूलमधील शिक्षकांची रिक्त पदे भरावी इत्यादी मागणी यावेळी करण्यात आली. (वार्ताहर)