शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:23 IST

बहुचर्चित पाणीपुरवठा विहीर भ्रष्टाचार प्रकरणी अटक केलेल्या ठेकेदाराला विहिरीचे बांधकाम चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी न्यायालयात जामिनाची पूर्वशर्त म्हणून तीस लाख रुपये मालेगाव सत्र न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती अनिरुद्ध गांधी यांनी दिले. सटाणा पोलिसांनी अटक केलेल्या विजय गिरिधारीलाल या ठेकेदाराची वरील अटी-शर्ती ठेवून एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने सुटका केली आहे.

ठळक मुद्देसटाणा विहीर भ्रष्टाचार प्रकरण : अटी-शर्तीवर ठेकेदाराची सुटका

सटाणा : बहुचर्चित पाणीपुरवठा विहीर भ्रष्टाचार प्रकरणी अटक केलेल्या ठेकेदाराला विहिरीचे बांधकाम चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी न्यायालयात जामिनाची पूर्वशर्त म्हणून तीस लाख रुपये मालेगाव सत्र न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती अनिरुद्ध गांधी यांनी दिले. सटाणा पोलिसांनी अटक केलेल्या विजय गिरिधारीलाल या ठेकेदाराची वरील अटी-शर्ती ठेवून एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने सुटका केली आहे.बांधकाम झाल्यानंतर नगरसेवक मुन्ना शेख यांनी विहीर बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून, मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणी दरम्यानच विहिरीचे बांधकाम कोसळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित ठेकेदार, तांत्रिक सल्लागार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानंतर सटाणा पोलिसांत गुन्हे दाखल झाल्यानंतर चारही संशयित आरोपींनी अटकपूर्व जमीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र उच्च व सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळून लावल्याने तब्बल दहा महिने चारही जण फरार होते. पैकी ठेकेदार विजय गिरधारीलाल दि. ११ डिसेंबरला पोलिसांना शरण आला.मालेगाव सत्र न्यायालयाने ठेकदार विजय गिरधारीलाल यांचा जमीन मंजूर केला असून, अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. तक्र ारदाराचा पुरावा नष्ट करण्याचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न करू नये आणि साक्षीदार यांना धमकी देऊ नये, ठेकेदाराने त्याचा नेहमीचा अधिकृत पत्ता, मोबाइल नंबरसह दाखल करावा. ठेकेदाराने जामिनाची पूर्वशर्त म्हणून न्यायालयात ३० लाख रुपये जमा करावेत, ठेकेदाराने सुटका झाल्याच्या दिवसापासून चार महिन्यांच्या आत स्वखर्चाने विहिरीचे बांधकाम करून द्यावे, पालिका प्रशासनाने या कामासाठी कार्यारंभ आदेश द्यावेत, विहिरीचे पुनर्बांधणीचे काम ठेकेदाराच्या खर्चाने झाल्यानंतर ठेकेदार व पालिका प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडील पूर्णत्वाचा अहवाल न्यायालयात दाखल करावा, पूर्णत्वाचा अहवाल मिळाल्यानंतर न्यायालयात जमा केलेली तीसलाख रुपयांची रक्कम ठेकेदाराला परत केली जाईल, असे न्यायमूर्ती गांधी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.शहराला पाणीपुरवठा करणाºया ठेंगोडा पाणीपुरवठा योजनेसाठी ९३ लाख रु पये खर्चून नदीपात्रालगत विहीर खोदकाम व बांधकाम करण्यात आले होते. ठेकेदार व तांत्रिक सल्लागार यांनी संगनमत करून गुणवत्ता नियंत्रण विभागाचे बनावट प्रमाणपत्र पालिकेला सादर केले. त्यानंतर त्या आधारे बिले काढून घेण्यात आली. बिले काढल्यानंतर काही दिवसांत विहिरीचे बांधकाम कोसळून भुईसपाट झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी