शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

जाचक अटी, कारवाईचा आयएमएतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 01:48 IST

कोरोनासारख्या महामारीत खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांचे कर्मचारी जीव धोक्यात घेऊन काम करीत असताना शासनाकडून करण्यात येणारी कारवाई आणि जाचक आदेशांच्या निषेधार्थ आयएमए नाशिकच्या वतीने शालिमार चौकात मंगळवारी (दि.११) आपले व्यवसाय नोंदणीपत्र आणि शासकीय आदेशांची होळी करण्यात आली. यावेळी राज्य सरकारचा निषेध असो अशा घोषणा करण्यात देण्यात आला.

ठळक मुद्देवैद्यकीय व्यावसायिकांचा संताप : शासकीय आदेशासह नोंदणी प्रमाणपत्राची केली होळी

नाशिक : कोरोनासारख्या महामारीत खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांचे कर्मचारी जीव धोक्यात घेऊन काम करीत असताना शासनाकडून करण्यात येणारी कारवाई आणि जाचक आदेशांच्या निषेधार्थ आयएमए नाशिकच्या वतीने शालिमार चौकात मंगळवारी (दि.११) आपले व्यवसाय नोंदणीपत्र आणि शासकीय आदेशांची होळी करण्यात आली. यावेळी राज्य सरकारचा निषेध असो अशा घोषणा करण्यात देण्यात आला.गेल्या सहा महिन्यांपासून खासगी वैद्यकीय व्यावसायिक कोरोना संकटात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. अनेक व्यावसायिक आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, काहींचा तर त्यात मृत्यू झाला आहे. अशावेळी शासकीय आणि खासगी डॉक्टरांना पन्नास लाख रुपयांचा विमा काढण्याच्या घोषणेला तीन महिने झाले तरी अद्याप एकालाही लाभ देण्यात आलेला नाही. सरकार यासंदर्भात भेदभाव करीत आहेत. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आता सरकारी आरोग्य यंत्रणांचे अपयश झाकण्यासाठी खासगी डॉक्टरांना जबाबदार धरले जात आहे. कोणताही शास्त्रीय आधार न घेता खासगी रुग्णालयांवर आर्थिक निर्बंध लादले जात आहेत, सदरचे नियम अटी हटविण्यासाठी आयएमएच्या वतीने प्रयत्न केले जात असताना त्याची दखल तर नाहीच; परंतु ३१ आॅगस्ट रोजी काढण्यात आलेल्या आदेशात सरकारी अटी अधिक जाचक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारचे जाचक नियम, कारवाई आणि बदनामीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.आयएमए य्रुग्णालयाच्या प्रांगणात व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र आणि शासकीय आदेशांची होळी करण्यात आली. यावेळी आयएमचे अध्यक्ष समीर चंद्रात्रे, डॉ सतीश पाटील, डॉ. सुदर्शन आहिरे, डॉ. कांचन लेले, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ, निनाद चोपडे, डॉ. सुदर्शन पंडीत, डॉ. प्रशांत देवरे, अनिरूध्द भांडारकर, डॉ. मालू, डॉ शोधन गोंदकर यांच्यासह अन्य संघटना सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.आयएमएकडून सर्व शाखांना दिवस भर आंदोलन करण्याचे निर्देश असले तरी नाशिक शहरामधील रूग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी केवळ दुपारी शालीमार चौकात आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी तोंडाला मास्क लावुन आरोग्य नियमांचे पालन देखील केले.

टॅग्स :Nashikनाशिकdoctorडॉक्टरagitationआंदोलन