शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीन फिल्ड’ला साडेतीनशे जमीनमालकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:53 IST

शेतकऱ्यांचा विरोध असताना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मखमलाबाद येथे स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रीन फिल्ड अंतर्गत तीन मॉडेल सादर केले असून, कंपनीने तर सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आयुक्तांना निवेदन दिले असून, साडेतीनशे जमीनमालकांचा साडेचारशे एकर क्षेत्र देण्यास विरोध असल्याने हा प्रकल्प रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी (दि.१२) आयुक्तांना दिले.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी : आयुक्तांचे मॉडेल तकलादू असल्याचे मत

नाशिक : शेतकऱ्यांचा विरोध असताना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मखमलाबाद येथे स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रीन फिल्ड अंतर्गत तीन मॉडेल सादर केले असून, कंपनीने तर सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आयुक्तांना निवेदन दिले असून, साडेतीनशे जमीनमालकांचा साडेचारशे एकर क्षेत्र देण्यास विरोध असल्याने हा प्रकल्प रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी (दि.१२) आयुक्तांना दिले.महापालिकेने स्थापन केलेल्या स्मार्ट सिटी अंतर्गत मौजे नाशिक आणि मखमलाबाद येथे साडेसातशे एकर क्षेत्रात हरित क्षेत्र विकास(ग्रीन फिल्ड) प्रकल्प राबविण्यात येणार आहे, परंतु त्यास सुरुवातीपासून बहुतांशी शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अहमदाबादचा दौरा करतानादेखील हा विरोध नमूद करूनच सतरा शेतकरी प्रतिनिधी गेले होते त्यानंतरदेखील सर्वेक्षण करतानादेखील विरोध करण्यात आला होता. मात्र तरीही प्रशासनाने हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. इतकेच नव्हे तर आयुक्तांनी शेतकºयासाठी तीन नवीन मॉडेल प्रस्तावित केले आहेत.मुळात महाराष्टÑातील नगरविकास कायद्यानुसार शेतकºयांना नगर रचना योजनेत सहभागी झाल्यास पन्नास टक्के जागा परत देण्यात येणार होती. मात्र अहमदाबाद येथे शेतकºयांनी भेट दिल्यानंतर तेथे ६० टक्के जागा शेतकºयांना परत मिळत असल्याने शेतकºयांनी शंका उपस्थित केल्या. यानंतर सर्वेक्षण आणि महापालिकेचा ठरावदेखील रोखण्यात आला होता. त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शेतकºयांना ५०-५० टक्के, ५५-४५ टक्के आणि नंतर ६०-४० टक्के अशा जागांच्या बदल्यात काय होऊ शकतो तसेच काय लाभाच्या तरतुदी असू शकतात याचे प्रारूप मांडले असून त्यापैकी एक मॉडेल शेतकºयांनी स्वीकारल्यास ते शासनाला पाठविले जाणार असल्याचे सांगितलेगेले. नुकतेच सर्वेक्षणदेखील पूर्ण झाले असून, त्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले असून, जागामालकानेच स्वत: विकास केल्यास त्याला ओपन स्पेस, गरिबांकरिता घरे, अ‍ॅमेनिटीज या बाबींचा विचार करूनही शंभर टक्के परतावा मिळू शकतो. त्यामुळे स्मार्ट सिटीला विरोध कायम आहे. साडेसातशे एकर पैकी साडेचारशे एकर क्षेत्रातील शेतकºयांचा विरोध असल्याने हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी शेतकºयांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे....तर शेतकरी भूमिहीनबहुतांशी शेतकरी अल्पभूधारक आहेत. तसेच त्यांची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. शेतीवर कर्ज काढून त्यांनी घरे बांधली आहेत. तसेच विहिरी केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प राबविल्यास असे शेतकरी भूमिहीन होतील, असे शेतकºयांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरी