शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विधीशाखेच्या पेपरफुटी प्रकरणी फेरपरीक्षा घेण्यास विद्यार्थ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 20:02 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेच्या २०१७ च्या पॅटर्ननुसार एलएलबी पदवीच्या प्रथम वर्षाचे पेपर फुटल्यानंतर संबंधित विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. परंतु, नाशिकमधील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध केला असून, या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाकडून चूक झाली आहे. त्यामुळे याची शिक्षा विद्यार्थ्यांना का दिली जात आहे? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित करीत विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांना निवेदन दिले आहे. 

ठळक मुद्देविधी शाखेचे पेपर फुटल्याचे प्रकरण वेबसाईटवर पेपर अपलो़ड करण्याचा प्रकार विद्यार्थ्यांचा फेर परीक्षा घेण्यास विरोध

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेच्या २०१७ च्या पॅटर्ननुसार एलएलबी पदवीच्या प्रथम वर्षाचे पेपर फुटल्यानंतर संबंधित विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. परंतु, नाशिकमधील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध केला असून, या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाकडून चूक झाली आहे. त्यामुळे याची शिक्षा विद्यार्थ्यांना का दिली जात आहे? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित करीत विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांना निवेदन दिले आहे. विद्यापीठाकडून एलएलबी प्रथम वर्षाच्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या अनुक्रमे गुन्हेगारी कायदा (लॉ ऑफ क्रामस्)व त्याचा पर्यायी विषय मालमत्ता कायदा (इंटेल्युक्युअल प्रॉपर्टी राइट्स) या विषयांचे पेपर फुटल्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दि. २० फेब्रुवारीला प्रकाशित करण्यात आली असून, त्याद्वारे पुनर्परीक्षेचे अयोजने करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाकडून चूक झाली आहे. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना देऊ नये, या प्रकरणास जबाबदार असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे. यावेळी विद्यार्थी नेते अजिंक्य गिते, तुषार जाधव, वैभव वाक्चौरे, प्राजक्ता जोशी, अभिजित गवते, राधिका रत्नपारखी, महेश गायकवाड, कुणाल डोळस स्वेताली अहिले, सानिका कुलकर्णी, मयुरी जाधव आदी विद्यार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकuniversityविद्यापीठSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेStudentविद्यार्थी