शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलतानपुरा रुग्णालय सुरू करण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:31 IST

नाशिक : सध्या जुन्या नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने मुलतानपुरा रुग्णालय सुरू करण्याची तयारी असताना दुसरीकडे मात्र स्थानिक नागरिकांनी मात्र विरोध केला आहे. शुक्रवारी (दि.१९) आयुक्त राधाकृष्ण गमे आणि अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली, तेव्हा या भागातील काही नागरिकांनी त्यास कडाडून विरोध केला. या भागात कोरोना रुग्ण दाखल झाल्यास आणखी गंभीर स्थिती निर्माण होईल या भीतीपोटी विरोध झाला तर आहेच, परंतु सध्या तर नियोजित प्रसूतिगृह सुरू करण्यासदेखील विरोध करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनाराजी । जमावाने घेतला आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सध्या जुन्या नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने मुलतानपुरा रुग्णालय सुरू करण्याची तयारी असताना दुसरीकडे मात्र स्थानिक नागरिकांनी मात्र विरोध केला आहे. शुक्रवारी (दि.१९) आयुक्त राधाकृष्ण गमे आणि अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली, तेव्हा या भागातील काही नागरिकांनी त्यास कडाडून विरोध केला. या भागात कोरोना रुग्ण दाखल झाल्यास आणखी गंभीर स्थिती निर्माण होईल या भीतीपोटी विरोध झाला तर आहेच, परंतु सध्या तर नियोजित प्रसूतिगृह सुरू करण्यासदेखील विरोध करण्यात आला आहे.मुलतानपुरा येथे मनपाच्या वतीने प्रसूतिगृह आणि रुग्णालय तयार करण्यात आले असून, सुमारे तीन वर्षांपासून राजकीय वादात हे वापराविना पडून आहे. सध्या या भागात कोरोनाचे रुग्ण वाढतआहेत. त्यातच जुने नाशिक भागातीलच नव्हे तर अन्यभागांतील कोरोनाबाधितांसाठी महापालिकेने डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय राखीव ठेवले आहे. त्यामुळे अन्य आजारांवरील उपचारासाठी वेगळी व्यवस्था नसल्याने कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या रुग्णांसाठी हे रुग्णालय सुरू करावी, अशी काही स्थानिक नागरिकांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या महासभेत प्रभागातील नगरसेविका समिना मेमन यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी अपुरे मनुष्यबळ असल्याने रुग्णालय सुरू करण्यास हतबलता दर्शविली होती.सदरचे रुग्णालय सुरू करण्यावरून स्थानिक नगरसेवकांत मतभेद आहेत. त्यामुळे या विषयावर राजकारण सुरू आहे. आयुक्तांचा दौरा पूर्वनियोजित नव्हता. मात्र, यानंतरही अचानक भेटीच्या वेळी विरोध करणारे कोठून आले? असा प्रश्न समिना मेमन यांनी उपस्थित केला आहे, तर राजकीय मतभेदांमुळे रुग्णालय सुरू होण्यात अडचणी येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या