शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंढेंच्या निर्णयाला भाजपातून विरोधाची सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:38 IST

महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या आतील प्रवेशद्वारासमोरील वाहनतळावर फक्त महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्याच वाहनांना जागा ठेवण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर त्याविरोधात पहिली प्रतिक्रिया सत्ताधारी भाजपातूनच उमटली आहे. भाजपाच्या एका नगरसेविकेने आयुक्तांना पत्र देत सदर वाहनतळ पूर्ववत सर्व पदाधिकाºयांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

नाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या आतील प्रवेशद्वारासमोरील वाहनतळावर फक्त महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्याच वाहनांना जागा ठेवण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर त्याविरोधात पहिली प्रतिक्रिया सत्ताधारी भाजपातूनच उमटली आहे. भाजपाच्या एका नगरसेविकेने आयुक्तांना पत्र देत सदर वाहनतळ पूर्ववत सर्व पदाधिकाºयांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी भाजपातूनच मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोधाची सलामी मिळाल्याने आगामी संघर्षाची ही नांदीच मानली जात आहे.  महापालिकेच्या राजीव गांधी भवनमधील आतील प्रवेशद्वारासमोरील वाहनतळाच्या जागेत आजवर महापौर, उपमहापौर, आयुक्त, स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, विषय समित्यांचे सभापती, प्रभाग समिती सभापती यांच्यासह नगरसेवकांचीही वाहने पार्क केली जात होती. याशिवाय, काही दुचाकीही लावल्या जात होत्या. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसºयाच दिवशी सदर वाहनतळावर केवळ महापौर, उपमहापौर आणि आयुक्त यांचेच वाहन पार्क होईल, असे आदेश सुरक्षा विभागाला दिले. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून सदर वाहनतळावर पदाधिकाºयांच्या वाहनांना ‘नो एण्ट्री’ केल्याने वाहनतळाची जागा मोकळी झाली आहे. त्याचे स्वागतही अभ्यागतांनी केले. वाहनतळावर पदाधिकाºयांसह नगरसेवक वाहने लावून देत असल्याने प्रवेशद्वारावर मार्ग काढणे अवघड बनत असे. मुंढे यांनी केवळ तीनच वाहनांसाठी पार्किंगचे आदेश दिल्याने पदाधिकाºयांसह नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर पसरला. गुरुवारी (दि. १५) नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील हे महापालिकेत आढावा बैठकीसाठी आले असता त्यांच्यासमवेत आलेल्या पदाधिकारी व आमदारांना पाठीमागील बाजूला वाहन पार्क करावे लागले. त्यामुळेही नाराजी प्रकटझाली.  दरम्यान, आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाला विरोधाची पहिली सलामी सत्ताधारी भाजपानेच दिली असून, सदर वाहनतळ पदाधिकाºयांच्या वाहनांसाठी पूर्ववत करण्याची मागणी भाजपाच्याच नगरसेवक वर्षा भालेराव यांनी आयुक्तांकडे केली आहे. याशिवाय, नगरसेवकांसाठी स्वतंत्र वाहनतळ उपलब्ध करून देण्याची सूचना करतानाच अभ्यागतांसाठीही मोकळ्या जागेत वाहनतळ उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.भालेरावांच्या खांद्यावर बंदूक महापालिका मुख्यालयातील वाहनतळाची जागा पदाधिकाºयांच्या वाहनांसाठी पूर्ववत उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाच्या वर्षा भालेराव यांनी केली आहे. मात्र, भालेराव यांचा बोलविता धनी वेगळाच असून, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आयुक्तांवर निशाणा साधण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे. वाहनबंदीच्या या निर्णयामुळे तुकाराम मुंढे यांच्या विरोधात ही पहिली ठिणगी असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका