इंदिरानगर : द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये-जा बंद करून ती अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुण्याकडून येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली असून, त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी अवजड वाहनांना या मार्गावर बंदी घालावी, अशी मागणी नगसेवकांनी केली आहे.महापालिकेने वडाळा नाका ते राजसारथी सोसायटीपर्यंत आणि सुमारे तीन वर्षांपूर्वी राजे छत्रपती चौक ते पाथर्डी गावापर्यंत नागपूरच्या धर्तीवर रस्ता तयार केला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येऊन रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. याच रस्त्यावर विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, सदिच्छानगर, समर्थनगर, सुचितानगर यांसह विविध उपनगरे उभी राहिली असून, या मार्गाचा वापर पाथर्डी गाव, वडनेर गेट, पिंपळगाव येथील विद्यार्थी, व्यावसायिक करतात. त्यामुळे दिवसभर या मार्गावर वाहनांची वर्दळ सुरू असते. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांपासून द्वारका चौकातून निर्बंध घालण्यात आलेले मालट्रक, ट्रेलर, कंटेनर, टॅँकरची वाहतूक वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून वळविण्यात आली आहे.पादचाऱ्यांना चालणे मुश्कीलअवजड वाहनांची दिवसभर वर्दळ वाढली असून, अगोदरच या भागात विनयनगर ते पांडव नगरी दरम्यान दोन्ही बाजूंना दुकाने असल्याने तेथे खरेदीसाठी गर्दी असते, त्यातच रस्त्यालगत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत अवजड वाहनांमुळे त्यात भर पडली असून, वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे पादचाºयांना चालणेदेखील मुश्किल झाले आहे.वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कलानगर चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यातच सदर रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू केल्याने वाहतूक कोंडीत भर पडेल तसेच कलानगर ते पाथर्डी गाव या रस्त्यावर शाळा व महाविद्यालय असल्याने वर्दळ सुरू असते. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक भरवस्तीतून बंद करण्यात यावी.- सतीश सोनवणे,मनपा सभागृहनेतेवडाळा-पाथर्डी रस्त्यावर अवजड वाहने वेगाने धावत आहेत. परिसरात सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. ते सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडतात. बेफाम वाहनांच्या कर्कश हॉर्नमुळे छातीत धडकी भरते.- रमेश नागरे, ज्येष्ठ नागरिक
वडाळा-पाथर्डी रस्त्यावर अवजड वाहनांना विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:45 IST
द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये-जा बंद करून ती अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुण्याकडून येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली असून, त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी अवजड वाहनांना या मार्गावर बंदी घालावी, अशी मागणी नगसेवकांनी केली आहे.
वडाळा-पाथर्डी रस्त्यावर अवजड वाहनांना विरोध
ठळक मुद्देनगरसेवक आक्रमक : अपघाताची व्यक्त होते भीती