शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाघाड कालव्याचे पाणी पाईपलाईनने नेण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 19:26 IST

दिंडोरी : तालुक्यातील वाघाड धरणाचे शेती सिंचनासाठी असलेले पाणी उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याद्वारे न सोडता बंदिस्त पाईपलाईनने नेण्याच्या वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाच्या निर्णयास लाभधारक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असुन त्याबाबत मडकीजांब येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देदिंडोरी : मडकीजांब येथील बैठकीत सर्व शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

दिंडोरी : तालुक्यातील वाघाड धरणाचे शेती सिंचनासाठी असलेले पाणी उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याद्वारे न सोडता बंदिस्त पाईपलाईनने नेण्याच्या वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाच्या निर्णयास लाभधारक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असुन त्याबाबत मडकीजांब येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला.वाघाड धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी केला जातो. हातनोरे, निळवंडी, पाडे, मडकीजांब, दिंडोरी, कोराटे, अक्र ाळे, मोहाडी, आंबे दिंडोरी, खतवड , जानोरी, जऊळके दिंडोरी या गावांची शेती या कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन आहे. या कालव्याची रब्बी व उन्हाळी आवर्तने शेतीसाठी वरदान ठरत असतात व द्राक्ष शेती सुदधा याच कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन आहे.या कालव्यावर अनेक वर्षापासुन उचल व प्रवाही पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या असुन पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाची निर्मिती केलेली आहे. पाणी वापर संस्थांना त्यांच्या मागणीनुसार पाणी आरक्षित करून पाणी पुरवण्यात येते व त्या प्रमाणात पाणीपट्टी आकारण्यात येते.अशी परिस्थिती असतांना काही दिवसांपुर्वी वाघाड पाणी वापर महासंघाच्या बैठकीत पाणी गळतीचे कारण देत वाघाड डाव्या कालव्याचे१५ कि. मी. तसेच वाघाड उजवा कालव्याचे पाणी बंदिस्त पाईपलाईनने ४५ कि.मी. पर्यंत नेण्याचा ठराव झाल्याची माहीती शेतकºयांना समजली व त्या निर्णयाविरोधात शेतकºयांनी एकत्र येत मडकीजांब येथे बैठक घेऊन या निर्णयास कडाडून विरोध दर्शविला आहे.यावेळी वाघाड पाणी वापर महासंघाचे अध्यक्ष तुषार वसाळ, उपाध्यक्ष मधुकर पवार, शहाजी सोमवंशी, चंद्रकांत राजे, प्रकाश वडजे, दिनकर जाधव, दत्तात्रय जाधव, दिलीप जाधव, बाळासाहेब मुरकुटे, कैलास पाटील, बाळासाहेब धुमणे, रमेश वडजे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.याप्रसंगी अंबादास पाटील, सोमनाथ बोरस्ते नरेश देशमुख आदींसह शेतकºयांनी मनोगतातून प्रस्तावित पाईपलाईन योजनेस विरोध दर्शवला.पाणी गळती रोखण्यासाठी महासंघाने आवश्यक त्या कठोर उपाययोजना कराव्यात, संपुर्ण कॅनालचे सिमेंट काँक्र ीटीकरण करावे, अनधिकृत पाणी वापर करणाºयांवर कायदेशीर कार्यवाही करावी, प्रत्येक किलोमीटरला पाणी मोजण्याची व्यवस्था करावी व पाणी गळती थांबवावी अशा सुचना शेतकºयांनी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाºयांनी यावेळी महासंघाच्या पदाधिकाºयांना दिल्या.या विरोधानंतरही बंदिस्त पाईपलाईनचा निर्णय घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. सभेचे सुत्रसंचालन सोमनाथ पताडे यांनी तर आभार रघुनाथ जगताप यांनी मानले. यावेळी लाभ क्षेत्रातील गावातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो २८ दिंडोरी)