शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंग, फार्मसी सीईटीसाठी २३ मार्चपर्यत अर्ज करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:06 IST

महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, अभियांत्रिकी व औषधनिर्माण पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २३ मार्चपर्यंत सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी आहे.

ठळक मुद्दे१६ अभ्यासक्रमांसाठी आॅनलाइन परीक्षा : बीपीएड, एमपीएड प्रवेशासाठी आॅफलाइनचाही पर्याय

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, अभियांत्रिकी व औषधनिर्माण पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २३ मार्चपर्यंत सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी आहे.अभियांत्रिकी, औषधनिर्माण-शास्त्र या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २ ते १३ मे या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षा होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ मार्चपर्यंत आहे. विलंब शुल्कासह ३१ मार्चपर्यंत अर्ज करता येतील. ही परीक्षा पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने होत आहे. इतर अभ्यासक्रमांसाठीही येत्या मार्च, एप्रिल व मे २०१९ मध्ये या सर्व प्रवेशपरीक्षा होणार असून, या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमएचटी-सीईटीची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असेल, अर्ज कसे भरावे, गुणांचा तपशील, सीईटीसाठी कोण पात्र असतील, परीक्षेची वेळ याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील संपूर्ण सूचना व माहिती वाचून समजून घ्यावी. त्यानंतर अर्ज भरावेत, असेही राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. एमएचटी सीईटीनंतर प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे वेगवेगळ्या १६ अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात एलएलबी, आर्किटेक्चर सीईटी, एचएमसीटी, बी.पीएड, बी.एड व एम.एड यांसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा होणार आहे.या सर्व परीक्षांतून केवळ एमएएच बी.पीएड फिल्ड टेस्ट व एमएएच एमपीएड फिल्ड टेस्ट या दोन सीईटी परीक्षा आॅफलाइन होणार असून, हे अपवाद वगळता सर्व परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येतील. वेळापत्रकात काही बदल झाल्यास ते कळविले जाणार असून, विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अशी होईल एमएचटी सीईटी परीक्षाअर्ज करण्याची मुदत-१ जानेवारी ते २३ मार्च४विलंब शुल्कासह अर्ज मुदत-२४ मार्च ते ३१ मार्च४शुल्क भरण्याची मुदत-३ एप्रिल४हॉल तिकीट उपलब्ध-२५ एप्रिल ते २ मे४एमएचटी-सीईटी परीक्षा-२ मे १३ मे

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा