शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी परीक्षा उनुत्तीर्णांसाठी यशाचा मार्ग, उत्तीर्णांनाही गुणवत्ता, श्रेणी सुधारण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 18:31 IST

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व  उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) च्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यशाचा व उत्तीर्ण  विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता व श्रेणी सुधारण्याची संधी असलेल्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून  त्यानुसार १७ ते ३० जुलै दरम्यान दहावी व १७ जुलै तर ३ आॅगस्ट दरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलै दरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ठळक मुद्देदहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी १७ जुलै तर ३ ऑगस्ट दरम्यान होणार पुरवणी परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर करता येणार अर्ज

नाशिक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व  उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) च्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यशाचा व उत्तीर्ण  विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता व श्रेणी सुधारण्याची संधी असलेल्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून  त्यानुसार १७ ते ३० जुलै दरम्यान दहावी व १७ जुलै तर ३ आॅगस्ट दरम्यान बारावी आणि  १७ ते ३१ जुलै दरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि. १४) पासून २४ जूनपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन  पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या मुदतीनंतर २५ ते २७ जून दरम्यान विलंब शुल्क भरून अर्ज करता येईल.  विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळांमार्फत अर्ज भरण्याचे आवाहन परिक्षा विभागाने केले आहे.

महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  फेबु्रवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आल्यानंतर या दोन्ही परिक्षांचा निकाल जाहीर झाले आहे. यातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे पुरवणी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले. आहे. त्यानुसार दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ९ ते १६ जुलै दरम्यान घेण्यात येणार असून  शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबार, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी २१ फेबु्रवारी ते २० मार्च दरम्यान बारावीची नियमित लेखी परीक्षा पार पडली होती. नाशिक विभागातून १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यातील १ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ८४.७७ टक्के इतके आहे. तसेच १ ते २२ मार्च २०१९ दरम्यान पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेस विभागातून १ लाख ८९ हजार ७५० विद्यार्थी बसले होते. यातील १ लाख ५४ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७७.५८ टक्के निकाल लागला होता. या दोन्ही परिक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसह श्रेणी सुधार करू इच्छिणाºया विद्यार्थ्यांनाही पुरवणी परिक्षेला बसता येणार आहे. 

अनुत्तीर्णांना संधी नाशिक विभागातून १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. त्यातील १ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण तर २४ हजार ३०९ विद्यार्थी अनुतीर्ण झाले होते. दहावीच्या १ लाख ८९ हजार ७५० पैकी १ लाख ५४ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण तर ३५ हजार ५५७ विद्यार्थी अनुतीर्ण झाले होते. दोन्ही मिळून ५९ हजार ८६६ विद्यार्थी अनुतीर्ण झाले असून त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची संधी आहे. याशिवाय उत्तीर्ण झालेले मात्र श्रेणी सुधार करून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेला प्रविष्ठ होता येणार आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीexamपरीक्षा