मातोरी : पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची नर्सरीमध्ये रोपे घेण्यासाठी झुंबड उडाली असून, टमाटा रोपांचा सर्वच ठिकाणी तुटवडा भासू लागला आहे. मध्यंतरी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकºयांच्या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप न दिल्याने अनेक शेतकºयांनी पावसातच टमाटा पिकाची लागवड केली होती. परंतु गेल्या आठवड्यात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने टमाटा रोपांची कुज होऊन मोठे नुकसान झाले आहे, तर काही शेतकºयांना पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी लागवड केलेली पिकेच वाहून गेली आहे. यंदा शेतीपिकांचे पहिल्यांदाच मोठे नुकसान झालेले असताना हताश झालेल्या शेतकºयांमध्ये पावसाने दोन दिवसांपासून दिलेल्या उघडीपीमुळे जोष संचारला असून, सर्वच शेतकरी शेतात जोमाने कामाला लागल्याचे दिसू लागले आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले असले व सरकारकडून अद्यापही पंचनामे झालेले नसले तरी, त्यासाठी किती दिवस वाट पहायची, असा सवाल शेतकरी करीत आहे. सरकारी कामाची दिरगाई हा नेहमीचा अनुभव असल्यामुळे यंदा पुरामुळे बाधित शेतकºयांनी पंचनाम्याची वाट न पाहता नवीन पिकांचा शोध सुरु केला आहे. पंचनाम्यासाठी वाट पाहिल्यास हंगाम हातचा निघून जाण्याची भीती शेतकºयांना वाटू लागली आहे. त्यामुळे सरकार पिकाचे पंचनामे करेल तेव्हा करेल त्याची वाट न पाहता शेतकºयांनी नवीन लागवड तर काही ठिकाणी रोपे पुनर्लागवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकºयांची रोपे घेण्यासाठी नर्सरीत गर्दी वाढली आहे. परिणामी नर्सरीत रोपांचा मोठा तुटवडा भासू लागला असून, अनेकांनी टमाटा लागवडीचे नियोजनच बदलत असल्याचे सागितले.
पावसाची उघडीप; रोपवाटिकेत शेतकऱ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:05 IST
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची नर्सरीमध्ये रोपे घेण्यासाठी झुंबड उडाली असून, टमाटा रोपांचा सर्वच ठिकाणी तुटवडा भासू लागला आहे. मध्यंतरी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकºयांच्या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसाची उघडीप; रोपवाटिकेत शेतकऱ्यांची गर्दी
ठळक मुद्देटमाटा रोपांची कमतरता : पंचनाम्यासाठी यंत्रणेची प्रतीक्षा