शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वंचित तरुणाईला कृतिशील करणारे मुक्त विद्यापीठ मार्चमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:35 IST

संजय पाठक । लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राजकारण, बदलती आलिशान लाइफ स्टाइल, सोशल मीडिया यात अडकलेल्या युवा पिढीच्या पलीकडे असाही वर्ग आहे की, ज्याची जगण्याची धडपड वेगळी आणि विषयही वेगळे आहेत. अशा युवकांसाठी ही परिस्थिती अनुरूप नसली तरी ती बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येऊ शकते. त्यांना ज्ञानातून त्यांच्या अंगीभूत शक्तीची जाणीव करून देण्यासाठी भाषा आणि संस्कृतीतज्ज्ञ तसेच विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी अनोखा मार्ग शोधला आहे. विचारांची देवाण- घेवाण करणारे अनोखे मुक्त विद्यापीठ तयार होणार असून, पारंपरिक विद्यापीठापेक्षा वेगळा ढाचा असणारे हे विद्यापीठ एका ठिकाणी नसेल आणि कोण एक कुलपती, कुलगुरूही नसेल. शासनाच्या मान्यतेशिवाय स्थापन झालेले हे समाजमान्य विद्यापीठ असणार आहे. या नवोेपक्रमाची पायाभरणी संतभूमी महाराष्टÑातच होणार असून, येत्या मार्च महिन्यात त्याची घोषणा होणार आहे.

संजय पाठक ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राजकारण, बदलती आलिशान लाइफ स्टाइल, सोशल मीडिया यात अडकलेल्या युवा पिढीच्या पलीकडे असाही वर्ग आहे की, ज्याची जगण्याची धडपड वेगळी आणि विषयही वेगळे आहेत. अशा युवकांसाठी ही परिस्थिती अनुरूप नसली तरी ती बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येऊ शकते. त्यांना ज्ञानातून त्यांच्या अंगीभूत शक्तीची जाणीव करून देण्यासाठी भाषा आणि संस्कृतीतज्ज्ञ तसेच विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी अनोखा मार्ग शोधला आहे. विचारांची देवाण- घेवाण करणारे अनोखे मुक्त विद्यापीठ तयार होणार असून, पारंपरिक विद्यापीठापेक्षा वेगळा ढाचा असणारे हे विद्यापीठ एका ठिकाणी नसेल आणि कोण एक कुलपती, कुलगुरूही नसेल. शासनाच्या मान्यतेशिवाय स्थापन झालेले हे समाजमान्य विद्यापीठ असणार आहे. या नवोेपक्रमाची पायाभरणी संतभूमी महाराष्टÑातच होणार असून, येत्या मार्च महिन्यात त्याची घोषणा होणार आहे.दक्षिणायन या संस्थेच्या माध्यमातून दक्षिणेत आणि आता महाराष्टÑातही युवकांच्या भावभावना समजावून घेणाºया डॉ. गणेश देवी यांनी सद्यस्थितीचे विवेचन करून युवकांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ शहरी, सोशल मीडियात गुरफटलेला तरुण हे आजच्या नव्या पिढीचे साकारले जाणारे चित्र. कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या मागे घोषणा देत, कधी त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत ऐन उमेदीची वर्षे वाया घालवणारी पिढी भानावर येते तेव्हा काही करण्यासावरण्याची वेळ निघून गेलेली असते. त्याशिवाय नवीन व्यसने, सोशल मीडिया, व्हर्च्युअल जगात वावरणारी आजची पिढी असे एक चित्र दिसून येते, परंतु समाजातील असाही युवा वर्ग आहे जो राजकारण, व्यवस्था, अपुरी साधनसामग्री आणि मूलभूत विषयांसाठीच संघर्ष करतो आहे. त्यांचे प्रश्न हे फार वेगळे आहेत, त्यांच्याकडे राजकारण- सोशल मीडियासाठी वेळ नाही. मात्र शिक्षण-रोजीरोटीसाठी रोजच लढाई करावी लागत आहे अशांचा आवाज ऐकण्यासाठी आणि त्यांचा जाहीरनामा ऐकून घेण्यासाठी डॉ. गणेश देवी यांनी आधी कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्टÑातही युवकांशी गटचर्चा ऐकून त्यांचा जाहीरनामा तयार करण्याचे काम हाती घेतले. अन्य राज्यांतही त्याची तयारी सुरू आहे. त्यातून युवा पिढीच्या माध्यमातून व्यवस्था किंवा सुविधांमध्ये बदल करण्यासाठी त्यांना राजकारण, चळवळी यापेक्षा वेगळा मार्ग शोधला आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. चळवळी किंवा राजकारण हा मार्ग अनुसरणाºयांना माझा नकार नाही, मात्र शिक्षणातून ही स्थिती बदलता येऊ शकते, या विषयावर मी अनेक वर्षांपासून अभ्यास करीत आहे, त्यातून लोकमान्य विद्यापीठाची नवी संकल्पना माझ्या डोक्यात घोंगावत होती. आता राज्यातील ठिकठिकाणी असलेल्या युवकांशी चर्चा केल्यानंतर त्याची गरज आणि उपयुक्तता असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे विचारांचे आणि ज्ञानाचे मुक्त विद्यापीठ असेल, परंतु त्याला कायद्याच्या चाकोरीचे आणि परंपरेचे बंधन नसेल. त्याचे एक ठिकाण नसेल तर गावागावांत ते असेल. गावातील सुजाण नागरिक आणि अभ्यासक त्याचे नियंत्रण करतील. परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेला कोणीही त्यात ज्ञानार्जन करू शकेल, त्यामुळे त्याला वयाचे आणि किमान शिक्षणाचे बंधन नाही. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माधयमातून पुस्तके या वंचितांपर्यंत पोहोचवता येईल. यात भूगोल- इतिहास नाही. उथळपणाने विरोध नाही की कोणत्या विचारांचे समर्थन नाही. स्वातंत्र्य, समता, संस्कृती, अभिव्यक्ती, पर्यावरण संतुलन असे विचारशील आणि कृतिशील शिक्षण असेल. अशा या वेगळ्या विद्यापीठाची घोषणा येत्या मार्च महिन्यात करण्यात येणार आहे. महाराष्टÑातील विचारांची मशागत संतांनी केली आहे. यामुळे अशाप्रकारचे मुक्त शिकवण आणि प्रबोधन करणारे हे लोक विद्यापीठ यशस्वी होईल, असा विश्वासही डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक