लासलगाव : येथील कोटमगाव रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाशिक येथील भारती भाऊसाहेब देवरे या विवाहितेच्या पर्सची चैन अज्ञात इसमांनी उघडुन राणी हार व गंठण एक लाख पाच हजार रूपयांचे चोरून नेल्याची घटना घडली आहे. येथील कोटमगाव रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाशिक येथील औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या कैलासनगर येथे रामानुजयेय मंदिराजवळ राहणाऱ्या भारती भाऊसाहेब देवरे या विवाहितेच्या पर्सची चैन अज्ञात इसमांनी उघडुन लहानग बॉक्समधील सोन्याचे साडेचार तोळे वजनाचा राणी हार व अडीच तोळ्याचा सोन्याचा नेकलेस व गंठण एक लाख पाच हजार रूपयांचा चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत लासलगाव पोलिस कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक एस.के. पांढरे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार ठोंबरे करीत आहेत.
पर्स उघडून साडेसात तोळ्याचे दागिणे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 15:04 IST