शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वनव्यातील गारवा देणारा खरा मित्र वृक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 23:41 IST

पिंपळगाव बसवंत : वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्ष हेच खरे मित्र आणि सध्या सोशल मीडियावर गाजणाऱ्या मित्र वनव्यातील गारव्यासारखा म्हणजे खरा मित्र वृक्षच जो आपल्याला तळपत्या उन्हात गारवा देतो, हेच हेरून १ ऑगस्ट रोजी निफाड तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायत व बसवंत गार्डन (पूर्वा केमटेक) यांच्या संयुक्त विद्यमाने गावात वृक्षारोपण करून मैत्री दिन साजरा केला आणि वृक्षाबरोबर मैत्रीची गाठ अधिकच घट्ट केली. याप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देमैत्रीची गाठ पक्की : मुखेड येथे मैत्री दिनानिमित्त वृक्षारोपण

पिंपळगाव बसवंत : वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्ष हेच खरे मित्र आणि सध्या सोशल मीडियावर गाजणाऱ्या मित्र वनव्यातील गारव्यासारखा म्हणजे खरा मित्र वृक्षच जो आपल्याला तळपत्या उन्हात गारवा देतो, हेच हेरून १ ऑगस्ट रोजी निफाड तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायत व बसवंत गार्डन (पूर्वा केमटेक) यांच्या संयुक्त विद्यमाने गावात वृक्षारोपण करून मैत्री दिन साजरा केला आणि वृक्षाबरोबर मैत्रीची गाठ अधिकच घट्ट केली. याप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.मैत्री दिनानिमित्त गावअंतर्गत ५०० झाडांचे रोपण पूर्ण करून यांनी अनोख्या पद्धतीने मैत्री दिवस साजरा केला.खरं तर वृक्षांसारखे मित्र कुठेच नाहीत. मित्राप्रमाणे आपण त्याना आपलं केलं तर ते आपल्याला आयुष्यभर जीवनावश्यक ऑक्सिजन, उन्हाळयात थंडगार सावली, आरोग्यदायी फळे, फुले असे खूप काही देतात. त्यामुळे वृक्षारोपण करून साजरा केलेला मैत्री दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला आणि झाडांशी केलेली ही मैत्री आयुष्यभर सगळ्यांना साथ देईल, असे मत मुखेड ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी बसवंत गार्डन पूर्वा केमटेकचे व्यवस्थापक संदीप वाघ, अविनाश पवार, मुखेड ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल जाधव, उपसरपंच वृषाली जाधव, ग्रामपंचायत सदस्य सागर शिंगाडे, शरद गायकवाड, पंकज जाधव, अनिता गांगुर्डे, जयश्री नेहरे, लिलाबाई पाटील, छाया जाधव आदींसह रमेश शेळके, संपत जाधव, सागर जाधव, विष्णू आहेर, विजय पवार, विक्रम जाधव, आशितोष जाधव, दत्तू पवार, सागर शेळके, शरद शेळके, श्रीकांत आहेर, किरण पवार, सुभाष शेळके, गणेश क्षीरसागर, भाऊसाहेब गांगुर्डे, भाऊसाहेब नेहरे, सतीश जाधव, शशिकांत शेळके, सागर शेळके, गेनू शेळके, महिंद्र थेटे, पंकज पवार, ज्ञानेश्वर पवार, कल्पेश पाटील आदींसह ग्रामसेवक कमलेश सावंत आदींसह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकारखरंतर मैत्रीसाठी सगळे दिवस खासच असतात. पण, मुखेड गावामधील ग्रामपंचायत प्रशासनाने वृक्षारोपण करून "मैत्री दिन" खूपच खास केला आहे. तसेच दर रविवारी एकत्र येऊन श्रमदान करून एक तास झाडांसाठी देत असतात. मुखेड येथील ग्रामपंचायत प्रशासन व गावकऱ्यांनी मोठ्या आनंदात व उत्साहात हा दिवस साजरा केला. मुख्य रस्ते, अंतर्गत रस्त्यांना वृक्षारोपण केले. 

टॅग्स :Friendship Dayफ्रेंडशिप डेSocialसामाजिक