शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

प्रभाग बैठकीत एकच विषय मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:52 IST

प्रभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या असो की बंद पथदीप असो संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर एकतर कर्मचारी नाही किंवा कर्मचारी पाठविले आहेत असे एकच ठरलेले उत्तर दिले जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी करून अधिकाºयांच्या उडवाउडवीच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली.

पंचवटी : प्रभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या असो की बंद पथदीप असो संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर एकतर कर्मचारी नाही किंवा कर्मचारी पाठविले आहेत असे एकच ठरलेले उत्तर दिले जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी करून अधिकाºयांच्या उडवाउडवीच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली.  पंचवटी प्रभाग समितीची गेल्या आठवड्यात अधिकारी बैठकीला उपस्थित राहत नसल्याच्या कारणावरून तहकूब केलेली बैठक सोमवार (दि.२९) प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत महापौरांच्या प्रभागात ग्रीन जिम साहित्य बसविणे या विषय पत्रिकेवरील एकाच विषयाच्या कामाला विनाचर्चा मंजुरी देण्यात आली.  मनपा आरोग्य विभागाच्या वतीने केवळ ड्रीम कॅसल सोसायटीजवळ व ज्या ठिकाणी कचरा साचत नाही अशा ठिकाणी स्वच्छता करण्यात येते. कुमावतनगर, जाणता राजा कॉलनी भागात स्वच्छता नाही. मनपा सुलभ शौचालय स्वच्छ राहत नसल्याची तक्र ार कमलेश बोडके यांनी केली.  प्रभाग ४ मधील लामखडे मळ्यात घंटागाडी नियमितपणे येत नसल्याने तसेच कमी दाबाने पिण्याचे पाणी येते त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली, असे प्रा. सरिता सोनवणे, शांता हिरे यांनी सांगून संबंधित विभाग दखल घेत नसल्याची तक्रार केली. प्रभाग २ मधील दत्तनगर, तुलसी कॉलनी येथे पाणी येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते असे पूनम सोनवणे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत नंदिनी बोडके, विमल पाटील, पूनम धनगर, शीतल माळोदे, भिकूबाई बागूल, सुरेश खेताडे आदींसह विभागीय अधिकारी बी. वाय. शिंगाडे, नगररचनाचे दौलत घुगे, संजय गोसावी, वसंत ढुमसे, राहुल खांदवे, वनमाळी आदींनी सहभाग घेतला होता.  लोकप्रतिनिधींनी केलेल्या घंटागाडी, पाणी, आरोग्य, विद्युत, तसेच अन्य नागरी समस्या मांडल्यास त्याची तत्काळ दखल घ्यावी, अशी सूचना माने यांनी केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका