शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा पाच टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 18:35 IST

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघे ७२ टक्के पाणी साठले होते. या पाण्यावरच पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी पाण्याचे आरक्षण टाकण्यात आले.

ठळक मुद्देपंधरा धरणांनी तळ गाठल्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कडाक्याचे ऊन व लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेत पाच टक्के जलसाठा शिल्लक राहिला असून, पंधरा धरणांनी तळ गाठल्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना जिल्हावासीयांना करावा लागत आहे. नाशिक शहरासह मराठवाडा, नगर या जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघे ७२ टक्के पाणी साठले होते. या पाण्यावरच पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी पाण्याचे आरक्षण टाकण्यात आले. शिवाय मराठवाडा, नगर या जिल्ह्यांचे आवर्तनही सोडण्यात आले. जानेवारी महिन्यांपासून जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली, शिवाय कडक उन्हाळा सुरू झाल्याने धरणाच्या पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने झाले. जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत मान्सून लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाच टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. गंगापूर धरणात १५ टक्के जलसाठा असून, समूहात १० टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सहा टक्क्याने जलसाठा घटला आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक