शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यातील धरणांमध्ये ३४ टक्केच साठा शिल्लक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:31 IST

मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ होताच पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय घट होऊ लागली असून, जेमतेम ३४ टक्के साठाच शिल्लक राहिला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक असून, गेल्या वर्षी मेअखेरीस फक्त १० टक्केच पाणी धरणांमध्ये शिल्लक होते.

ठळक मुद्देगत वर्षाच्या तुलनेत वाढ : यंदाही पाऊस समाधानकारक

नाशिक : मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ होताच पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय घट होऊ लागली असून, जेमतेम ३४ टक्के साठाच शिल्लक राहिला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक असून, गेल्या वर्षी मेअखेरीस फक्त १० टक्केच पाणीधरणांमध्ये शिल्लक होते.नाशिक जिल्ह्यातील धरणांची साठवण क्षमता ६५,५१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सर्वत्र सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहिली होती. त्यामुळे आॅक्टोबरअखेर काही धरणांचे दरवाजे उघडून देत विसर्ग करावा लागला. परिणामी नदी, नाल्यांना महापुराची स्थिती निर्माण झाली तर विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्यांपर्यंत पावसाची हजेरी कायम राहिल्याने जमिनीतील पाणीपातळीत वाढ झाली.त्यामुळे यंदा दरवर्षापेक्षा उशिराने जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. तथापि, धरणांमध्ये पाणी भरपूर असले तरी, धरणाच्या पाण्यावर असलेलेइतर आरक्षणाचा विचार करता यंदा मे महिन्यात फक्त ३४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.हवामान खात्याने यंदाही पाऊस समाधानकारण पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे; परंतु पाऊस काहीसा लांबणीवर पडणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.दारणा धरणात६६ टक्के पाणीदारणा धरणात ६६ टक्के जलसाठा आहे, तर ओझरखेडमध्ये ४१, पालखेड १६, भावली २०, वालदेवी २२, चणकापूर २७, हरणबारी ३३, गिरणा ३४ टक्केअशाप्रकारे प्रमुख धरणांमध्ये पाणी शिल्लक आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूहात ३८ टक्के जलसाठा असून, गंगापूर धरणात ४७ टक्केपाणी आहे. सध्या कश्यपी व गौतमीगोदावरीतून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या वर्षी मात्र याचवेळी जिल्ह्यातील दहा धरणांनी तळ गाठला होता. यंदा मात्र अद्याप तशी वेळ आलेली नाही.

टॅग्स :WaterपाणीDamधरण