शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने खुल्या केल्या अवघ्या २५ मिळकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:04 IST

महापालिकेने मिळकती सील करण्यावरून बरेच रामायण घडल्यानंतर प्रशासनाने अखेरीस काही मिळकतींचे सील काढण्यास प्रारंभ केला आहे.

नाशिक : महापालिकेने मिळकती सील करण्यावरून बरेच रामायण घडल्यानंतर प्रशासनाने अखेरीस काही मिळकतींचे सील काढण्यास प्रारंभ केला आहे. महापालिकेने गेल्या आठवड्यात ३७४ मिळकती सील केल्या होत्या. त्यापैकी २५ मिळकतींचे सील काढून त्याचा पुनर्वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. यातील अवघ्या १२ मिळकतीच महापालिकेच्या मागणीनुसार रेडीरेकनरच्या अडीच टक्के भाडे भरू शकल्या आहेत. तर उर्वरित १३ मिळकती या सेवाभावी वृत्तीने काम करीत असल्याने त्यांनी रक्कम न भरताही सील उघडण्यात आले आहे.महापालिकेच्या मिळकती अनेक संस्थांना भाड्याने देण्यात आल्या असून, समाजमंदिराच्या अनेक जागेत अभ्यासिका, वाचनालये, व्यायामशाळा या संस्था सुरू केल्या होत्या. अनेक संस्था सेवाभावी वृत्तीने काम करीत असल्या तरी मुलांकडून शुल्क आकारणी आणि अन्य अनेक कारणांनी त्यांचा दुरुपयोगदेखील होत होता.काही ठिकाणी समाजमंदिरे, मंगल कार्यालयदेखील गंगापूर रोडवरील क्रीडा संकुलात तर पतसंस्थेला भाड्याने जागा देण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे महापालिकेने सील लावण्यास प्रारंभ केला असला तरी ज्या संस्था खरोखरीच सेवाभावी वृत्तीने काम करतातात, अशा संस्था यात भरडल्या गेल्या.ज्येष्ठ नागरिक मंडळांचे विरंगुळा केंद्र, हास्य क्लब, योगा हॉल तसेच स्वामी समर्थ सेवा केंद्रासारखी नि:शुल्क स्थळेदेखील सील करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात होता. तर ऐन स्पर्धा परीक्षांच्या तोंडावर अभ्यासिका तसेच क्र्रीडा स्पर्धांचा सिझन असताना क्रीडा संकुले बंद झाल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. त्यावर तोडगा काढून सेवाभावी आणि नि:शुल्क काम करणाऱ्या संस्थांना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलासा  दिला असला तरी अभ्यासिका वाचनालय तसेच व्यायामशाळांना रेडीरेकनरच्या दराच्या अडीच टक्के भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.पुढील महिन्यात महासभा असून, त्यावेळी हे दर कमी करून रेडीरेकनरच्या पाव टक्के अथवा एक टक्का करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर आत्ता भरलेले भाडे वळते करून घेण्यात येणार आहे.तथापि, महापालिकेचा पुरेसा प्रतिसाद मिळाला नसून अवघ्या १३ संस्थांनीच पैसे भरले आहेत. उर्वरित १२ संस्थांनी पैसेच भरलेले नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक